वकीलांना पुन्हा एकदा दिलासा, तिसर्‍यांदा लोकल प्रवासासाठी मुदतवाढ

प्रशांत कांबळे
Thursday, 3 December 2020

राज्य सरकारच्या विनंतीनंतर वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचार्यांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासाची मुभा वाढून देण्यात आली आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या विनंतीनंतर वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचार्यांना तिसर्‍यांदा लोकल प्रवासाची मुभा वाढून देण्यात आली आहे. यापूर्वी 1 डिसेंबर पर्यंत वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील आदेश मिळेपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने 23 नोव्हेंबर पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर  वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांनाच लोकलमधून प्रवासाला मुभा देण्यात आली होती. मात्र 23 नोव्हेंबरला हा कालावधी संपल्याने राज्य सरकारांनी 1 डिसेंबर पर्यंत वकीलांना  लोकल प्रवासात मुभा वाढून दिली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा राज्य सरकारने वकील आणि न्यायालयातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याच्या मागणीवरून मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.  या मुदतवाढीत तारीख निश्चित केले नसल्याने वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी बैठक 

लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण बैठक पुढल्या आठवड्याच्या शेवटी होणार आहे. तो पर्यंत कोविडचा आढावा घेऊन या बैठकीत लोकल सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आहे. कोविड नियंत्रणात असल्यास 15 डिसेंबरनंतर लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारही होऊ शकतो, असे संकेत महापालिकेकडून मिळत आहेत.

अधिक वाचा- कॉमेडियन भारती सिंह ड्रग्स प्रकरणः NCB चे दोन अधिकारी निलंबित

मुंबईतील लोकल ट्रेनच्या 90 टक्के फेऱ्या सुरु झाल्या आहेत. मात्र,अद्याप सर्वांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. मुंबई लोकलमधून रोज 70 ते 80 लाख प्रवासी प्रवास करतात. महामुंबईची अर्थव्यवस्था पूर्णपणे लोकलवर अवलंबून आहे. 

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Consolation lawyers once again third time extension for local train travel


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Consolation lawyers once again third time extension for local train travel