esakal | परमबीर सिंह, रश्मी शुक्ला यांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

परमबीर सिंह, रश्मी शुक्ला यांना दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर २१ ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai) दिली. परमबीर सिंह तसेच परमवीर सिंह यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे, असे गुरुवारी ग्रुहमंत्रांनी (Home Minister) सांगितले आहे. सिंह देश सोडून फरारी झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पोलिस (Police) निरीक्षक भीमराव घाडगे यांनी एका प्रकरणात तपास थांबवण्यासाठी सिंह यांनी छळ केला, असा आरोप करत सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: ठाण्यातील खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हायकोर्टात याचिका

हा गुन्हा रद्द करण्यासाठी सिंह यांनी याचिका केली आहे. तसेच, फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांनीही याचिका केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्ला यांच्यावरही कठोर कारवाई करणार नाही, असे आज सरकारी वकील जयेशा याज्ञिक यांनी सांगितले. शुक्ला यांनी गोपनीयता कायद्याचा भंग करून सरकारी अहवाल खुला केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

loading image
go to top