Tourism Submarine Project
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - देशातील पहिल्या पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)ने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, २०२७ अखेरपर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या निर्मितीतील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर एमडीएल आता पर्यटकांसाठी विशेष २४ आसनी सबमरीन उभारण्याबरोबरच तिच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक प्रणाली विकसित करत आहे.