कासा : डहाणू तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये घरकुल योजनांचे बांधकाम सुरू आहे. काही कामे विविध कारणांमध्ये अपूर्ण आहेत. या कामांचा दर्जा तपासण्यासाठी, लाभार्थ्यांच्या समस्या जाणण्यासाठी आवास योजनेची राज्य गृहनिर्माण, तसेच अपर आयुक्त बांधकामांची पाहणी केली. अपूर्ण घरकुलांची कामे डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.