'कंटेन्मेंट झोन'चे फलक फक्त 'नावापुरतेच', आतील परिस्थिती मात्र जैसे थे

शरद वागदरे : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 July 2020

सरकारने जून महिन्यात लॉकडाऊनला अनलॉक केल्यानंतर नवी मुंबईतील बांधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून 3 जुलैपासून 19 जुलैपर्यंत एपीएमसी व एमआयडीसी वगळून अन्य परिसरांमध्ये लॉकडाऊन घोषित केला.

वाशी : कंटेन्मेंट झोनमधील नागरिक बिनधास्तपणे बाहेर वावरत आहे. तर इतर ठिकाणचे नागरिकही कंटेन्मेंट झोनमध्ये ये-जा करत आहेत. अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली दुकानांमधून छुप्या पद्धतीने विक्री करण्यात येत आहे. तर कट्ट्यावर गप्पांचे फडही रंगत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंटेन्मेट झोनच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला असून, हे केवळ नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून फक्त कंन्टेमेंट झोनचे फलक लावून आपली जवाबदारी झटकून टाकली आहे. 

महत्वाची बातमी जेएनपीटीतील बहुचर्चित 'SEZ' उभारणीबाबत महत्वपूर्ण निर्णय, रोजगार निर्मितीच्या आशा पल्लवीत

सरकारने जून महिन्यात लॉकडाऊनला अनलॉक केल्यानंतर नवी मुंबईतील बांधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पालिका प्रशासनाकडून 3 जुलैपासून 19 जुलैपर्यंत एपीएमसी व एमआयडीसी वगळून अन्य परिसरांमध्ये लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर 20 जुलैपासून पुन्हा नवी मुंबई अनलॉक करण्यास सुरुवात केली. मात्र, 43 परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. या झोनमध्ये कडक निर्बंध असूनही पोलिस बंदोबस्त तैनात नसल्यामुळे रिकाम टेकड्यांचा वावर वाढला आहे. छुप्या पद्धतीने दुकानांतून विक्री, तर काही ठिकाणी गप्पांचे फड रंगताना ठिकठिकाणी दिसून येत आहेत. इतकेच नाही तर इतर ठिकाणचे नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये बिनधास्त येत आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोन आणि कंटेन्मेंट झोन नसलेला परिसर यामध्ये कोणताच फरक जाणवत नसल्याने नवी मुंबईतील सुज्ञान नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या, तसेच दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

नक्की वाचा : बापरे ! "...नाहीतर तब्बल '५० लाख' कर्मचारी होतील बेरोजगार", वाचा कुणी व्यक्त केलीये 'ही' भीती

कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची तपासणी करताना पोलिस बंदोबस्त देण्यात यावे, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे प्रशासनाद्वारे केली आहे. तसेच, कंटेन्मेंट झोनमध्ये वेळावेळी जाऊन पाहणी करण्यास विभाग अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. 
- सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई 

कंटन्मेंट झोनमध्ये अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच, परिसरामध्ये पालिका प्रशासनाला पोलिस बंदोबस्त लागत असल्यास त्यांना तो उपलब्ध करून देण्यात येईल. 
- पंकज डहाणे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ 1

(संपादन : वैभव गाटे)

Containment Zone plan in not working the internal conditions were the same


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Containment Zone plan in not working the internal conditions were the same