जेएनपीटीतील बहुचर्चित 'SEZ' उभारणीबाबत महत्वपूर्ण निर्णय, रोजगार निर्मितीच्या आशा पल्लवीत

सुजित गायकवाड : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 July 2020

केंद्र सरकारतर्फे पहिल्यांदाच सागर किनारी बहू उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र घोषित लाखो नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी घोषणा केली होती.

नवी मुंबई : जेएनपीटी बंदरात पहिल्यांदाच उभारण्यात येणारे बहुचर्चित एसईझेड (SEZ) (विशेष आर्थिक क्षेत्र) सुरू करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांचे काम झाल्यामुळे पाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एसईझेडचे विकास आयुक्त यांनी कंपन्यांना बांधकाम करण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. 

महत्वाची बातमी : मुंबईत ३ महिन्यांसाठी कोरोना योद्धांची भरती, असा दाखल करा अर्ज

केंद्र सरकारतर्फे पहिल्यांदाच सागर किनारी बहू उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र घोषित लाखो नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी घोषणा केली होती. तसेच 2014 ला नरेंद्र मोदी यांनी जेएनपीटीत होणाऱ्या पहिल्या एसईझेडचे भूमिपूजन केले होते. जेएनपीटीतील तब्बल 277 हेक्टर जमिनीवर हे बहू उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण होत आहे. अशाप्रकारचे बंदराचा विकास करणारे जेएनपीटी देशातील पहिले बंदर ठरले आहे. जेएनपीटी एसईझेडमध्ये मेसर्स ओडब्ल्यूएस एलएलपी आणि मेसर्स क्रिश फूड इंडस्ट्री (इंडिया) या दोन कंपन्यांनी त्यांचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले आहे. विकास आयुक्तांनी या दोन कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच काम सुरू केल्याचे घोषित केले. या दोन कंपन्याप्रमाणेच आणखीन तीन कंपन्यांना लवकरच बांधकाम करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे जेएनपीटी प्रशासनाने सांगितले.

नक्की वाचा : बापरे ! "...नाहीतर तब्बल '५० लाख' कर्मचारी होतील बेरोजगार", वाचा कुणी व्यक्त केलीये 'ही' भीती

आतापर्यंत एसईझेडमध्ये 19 एमएसएमई आणि एक मुक्त व्यापार वेअरहौसिंग यांना भूखंड देण्यात आले आहेत. जेएनपीटी एसईझेडचे काम पूर्ण झाल्यावर यात 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 57 हजार रोजगारनिर्मिती होईल, अशी अपेक्षा जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केली. बहू उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी जेएनपीटीला विशेष योजना प्राधिकरण दर्जा प्राप्त आहे. राज्याच्या एमईआरसी विभागाकडून जेएनपीटीच्या एसईझेडला वीज वितरण परवानासुद्धा देण्यात आला आहे. एसईझेडच्या उभारणीसाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे जेएनपीटी सेझमध्ये कंपन्यांना युनिट्स सुरू करतेवेळी वेळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे, असे सेठी यांनी सांगितले. 

महत्वाची बातमीमुंबईतील कोरोना नियंत्रणाचं जगभरात कौतुक, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...

जेएनपीटीमध्ये तयार होत असलेल्या एसईझेडचे निर्माण आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार होत आहे. त्यामुळे भारताला निर्माणकर्ता देश म्हणून जागतिक ओळख तयार करण्यास जगातील नामांकित कंपन्या या एसईझेडमध्ये येतील, असा विश्वास आम्हाला वाटत आहे. संभाव्य गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीमुळे जेएनपीटीतील सर्व अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 
- संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी

(संपादन : वैभव गाटे)

important decisions regarding SEZ in JNPT raise hopes of job creation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important decisions regarding SEZ in JNPT raise hopes of job creation