कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला दाखल

कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला दाखल

मुंबई : "रिपब्लिक टीव्ही'चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटविरोधात त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी, या मागणीला एटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी सहमती दिली आहे. यानुसार कामरा यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतंत्र अस्तित्वाला आणि न्यायदानाच्या निष्पक्षपाती पद्धतीला या ट्विटने छेद गेला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याची फौजदारी कारवाई कामरा यांच्यावर करावी, असे माझे मत आहे, असे वेणूगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पुण्यातील दोन विधी विद्यार्थ्यांसह तीन वकिलांनी याबाबत दावा केला आहे. 

कामरा यांनी बुधवारी गोस्वामी यांना जामीन मिळाल्यावर काही ट्विट केले होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्यावर उपरोधिक शेरेबाजी केली आहे. यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शिफारस करावी, अशी मागणी आठ जणांनी पत्राद्वारे केली होती, असा दावा वेणूगोपाल यांनी केला आहे. या पत्रांची दखल घेऊन त्यांनी कारवाईची शिफारस केली आहे. कामरा यांनी केलेली ट्विट खूपच आक्षेपार्ह आणि फौजदारी कारवाई करण्यायोग्य आहे, असेही वेणूगोपाल यांनी म्हटले आहे. 

Contempt of Supreme Court by Kunal Kamar? 

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com