

BMC
ESakal
मुंबई : अंधेरी पश्चिम विभागातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामाच्या कंत्राट खर्चात तब्बल २४ कोटी ४१ लाख रुपयांची वाढ झाली आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. पाण्याची गळती थांबवणे, दूषित पाण्याचे निराकरण, पाणीपुरवठा वाहिन्यांचे नूतनीकरण, नवीन जलवाहिन्या टाकणे आणि झडप कक्षांची बांधणी अशा कामांच्या व्याप्तीत वाढ झाल्याने हा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.