
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी बस चालक व वाहकांनी शुक्रवारी (ता. १) सकाळपासून संप पुकारला. या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर दुपारी हा संप मागे घेण्यात आला.