BMC
ESakal
मुंबई
Mumbai News: बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार, महापालिका आयुक्तांसोबतच्या भेटीत मागणी मान्य होणार?
Mumbai Municipal Corporation Health Workers News: बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे.
मुलुंड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने यंदा स्थायी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. या निर्णयाचे स्वागत झाले असले तरी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे शहरातील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे जवळपास पाच हजार कंत्राटी आरोग्य कर्मचारी बोनसपासून वंचित राहिले आहेत.

