...जमिनीवरच सतरंजी पसरवून आमदार साहेब झालेत गुडूप, कार्यकर्ते आश्चर्यचकित !

...जमिनीवरच सतरंजी पसरवून आमदार साहेब झालेत गुडूप, कार्यकर्ते आश्चर्यचकित !

मुंबई एक असं शहर जिथे कुणीही उपाशी झोपत नाही असं बोलतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी. इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लोकं कामधंदा शोधण्यासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी देखील राज्यभरातून मुंबई येत असतात. कुणी नोकरीच्या शोधात येतं तर कुणी आजारी नातेवाईकाला घेऊन. मात्र मुंबईत हॉटेलमध्ये राहणं अनेकांच्या खिशाला परवडणारं नसतं. अशात परवडणारा उपाय कोणता तर आमदार निवासमध्ये राहणे. मुंबईतील आमदार निवास हे राज्यभरातून येणाऱ्या अनेकांसाठी निवारा ठरत असत. जवळजवळ प्रत्येक आमदारांच्या खोल्या कायम कार्यकर्त्यांनी  भरलेल्या असतात. 

सध्या सोशल मीडियावर अशाच एका आमदार निवासातील फोटो चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये स्वतः आमदार हे जमिनीवर सतरंजी पसरून झोपलेले पाहायला मिळतायत, तर कार्यकर्ते मात्र पलंगावर झोपलेले पाहायला मिळतायत. पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानात हा फोटो आहे. 

पारनेरचे आमदार लंके यांना आकाशवाणी आमदार निवासात 109 क्रमांकाची खोली मिळाली आहे. सदर दिवशी आमदार लंके हे आपलं काम संपवून रात्री १२ वाजता निवासस्थानी आलेत. मात्र निवासस्थानी त्यांच्या बेडवर काही कार्यकर्ते थकून झोपल्याचं लंके यांच्या निदर्शनास आलं. रात्रीचे १२ वाजले असल्याने आणि कार्यकर्ते थकून झोपल्याने आमदार लंके यांनी कुणालाही उठवलं नाही. स्वतः आपल्या बेडजवळ सतरंजी पसरवून लंके झोपलेत. कार्यकर्ते थकून भागून येतात, त्यांना रात्री कशाला उठवायचं असं लंके म्हणालेत. 

सकाळी जेंव्हा कार्यकर्त्यांना जाग आली तेंव्हा सर्वांनाच लंके यांच्या कृत्याचं आश्यर्य वाटलं. सर्वच कार्यकर्त्यांकडून लंके यांचं कौतुकही करण्यात आलं. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सोशल मीडियावरही आमदार लंके यांचं प्रचंड कौतुक केलं जातंय. 

mla nilesh lanke slpet on floor when he saw party workers are sleeping on his bed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com