Mumbai News: झाडे तोडण्याचा वाद चिघळला! प्राधिकरणाच्या बैठकीत एमआयएम आक्रमक

Mumbai Tree Cutting: धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली रस्ते आणि वाहन मार्गिकांसाठी २१० झाडे बाधित होणार आहेत. झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद चिघळला असून प्राधिकरणाच्या बैठकीत एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली.
 Tree Cutting

Tree Cutting

sakal

Updated on: 

मुंबई : धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली रस्ते आणि वाहन मार्गिकांसाठी २१० झाडे बाधित होणार आहेत. झाडे वाचवण्यासाठी पर्यायी आराखडे तपासले का, पुनर्रोपण केलेल्या झाडांचा हिशेब कुठे आणि किती झाडे प्रत्यक्ष जगली, असे सवाल उपस्थित करीत एमआयएमने मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले. वृक्षतोडीच्या प्रस्तावांवर आक्षेप, पर्यावरणीय मुद्द्यांवर बोलू न दिल्याचा आरोप आणि निषेध व्यक्त करीत एमआयएमचे सदस्य व गटनेते विजय उबाळे यांनी सभात्याग केला.

Loading content, please wait...