'छपाकची मूळ संकल्पना आणि कथा माझी', छपाक वादाच्या भोवऱ्यात..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

साधारण एखादा पौराणिक किंवा इतिहासावर आधारित सिनेमा असेल तर त्याबद्दलचे वाद विवाद कायम सिनेमा प्रदर्शित होण्याआधी समोर येताना पाहायला मिळालेत. मात्र येऊ घातलेल्या 'छपाक' सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात सापडताना पाहायला मिळतोय.  

नक्की झालंय काय ? 

साधारण एखादा पौराणिक किंवा इतिहासावर आधारित सिनेमा असेल तर त्याबद्दलचे वाद विवाद कायम सिनेमा प्रदर्शित होण्याआधी समोर येताना पाहायला मिळालेत. मात्र येऊ घातलेल्या 'छपाक' सिनेमा आता वादाच्या भोवऱ्यात सापडताना पाहायला मिळतोय.  

नक्की झालंय काय ? 

ऍसिड हल्यातून बचावलेल्या मुलीची कहाणी सांगणाऱ्या आगामी छपाक सिनेमाच्या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात लेखक राकेश भारती यांनी दावा दाखल केला आहे. अभिनेत्री दिपिका पदुकोणची मुख्य भूमिका छपाकमध्ये असून फॉक्‍स स्टार स्टुडिओची निर्मिती असलेला हा सिनेमा जानेवारीमध्ये प्रदर्शित होत आहे.

महत्त्वाची बातमी : झारखंड निकालांवर राजकीय चाणक्य शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात..

छपाकची मूळ संकल्पना आणि कथा माझी

छपाकची मूळ संकल्पना आणि कथा ही माझी असून त्याबाबतची रितसर नोंदणीही इंडियन मोशन पिक्‍चर्स असोसिएशनकडे (इंपा) करण्यात आली आहे. ब्लॅक डे या नावाने फेब्रुवारी 2015 मध्येच ही नोंदणी केली होती, असे या दाव्यामध्ये म्हटले आहे. यावर सिनेमा बनविण्यासाठी अनेक अभिनेते, निर्माते यांच्याकडे चर्चा केली होती. यामध्ये फॉक्‍स स्टार स्टुडिओचाही समावेश आहे. मात्र अनेक अपरिहार्य कारणांमुळे सिनेमाचे काम पुढे जाऊ शकले नाही, असेही स्पष्ट केले आहे. मात्र आता याच पटकथेवर फॉक्‍स स्टारचा सिनेमा येत आहे असे कळले. त्यामुळे कंपनीकडे याबाबत तक्रार केली, मात्र त्यांनी काहीच दाद न दिल्यामुळे न्यायालयात दावा दाखल केला, असे भारती यांचे म्हणणे आहे.

महत्त्वाची बातमी : नवी मंबईतील ‘या’ परिसरात नागरिक धास्तावले! पाहा नेमकं काय झालंय..

निर्मात्यांनी लेखकांच्या यादीमध्ये मलाही श्रेय द्यावे, अन्यथा सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऍडव्होकेट अशोक सरोगी यांच्या मार्फत केलेल्या केलेल्या या दाव्यावर सुट्टीकालीन न्यायालयात 27 तारखेला होणार आहे. ऍसिड हल्यामध्ये जखमी झालेल्या लक्ष्मी आगरवाल या तरुणीची ही कथा असून सिनेमाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

WebTitle : controversy related to Chhapaak movie writer rakesh bharati claims it is my script


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversy related to Chhapaak movie writer rakesh bharati claims it is my script