esakal | झारखंड निकालांवर राजकीय चाणक्य शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात..
sakal

बोलून बातमी शोधा

झारखंड निकालांवर राजकीय चाणक्य शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात..

भाजपाच्या आर्थिक ताकदीला न जुमानल्याबद्दल धन्यवाद - शरद पवार

झारखंड निकालांवर राजकीय चाणक्य शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणतात..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आज झारखंडचा निकाल समोर आलाय. झारखंडच्या निकालामध्ये नागरिकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय. दरम्यान या बाबतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे.  

झारखंड मधील स्थिती अन्य राज्यांपेक्षा वेगळी आहे. झारखंड हे राज्य आदिवासी बहुल आहे. इथे नोकरीच्या समस्या आहेत. मात्र राज्य हातात ठेवण्यासाठी भाजपने सत्तेचा वापर केला. भाजपने अवलंबलेली पद्धत चुकीची असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. झारखंडच्या जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

शरद पवारांच्या मते केंद्राने देशाचं अर्थकारण योग्य प्रकारे हाताळलं नाही.  देशातील मंदीचं चित्र दिवसागणिक वाढत जातंय. देशातील गुंतवणुकीचं वातावरण कमी होतंय. म्हणूनच झारखंडमध्ये भाजपला नापसंती देण्यात आली. 

महत्त्वाची बातमी : झारखंडमध्येही पराभव; काय चुकलं भाजपचं?

याशिवाय देशात नुकताच लागू झालेला CAA म्हणचे सुधारित नागरिकत्व कायद्याचा मोठ्या प्रमाणात झारखंड निवडणुकांवर प्रभाव पडलेला दिसतोय. देशात CAA किंवा NRC सारख्या कायद्यांची गरज नाही. अशा मुद्यांवरून समाजात आणि देशात जातीय तणाव आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं देखील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलंय. देशात असंच सुरु राहिलं तर देशातील लोकं आपला निर्णय झारखंडच्या पद्धतीने घेतील असा विश्वास शरद पवार यांनी बोलून दाखवलं आहे.  

यावेळी बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या भाषाणार मोदींनी टीका केली. CAA बद्दल बोलताना मंत्रिमंडळाने हा कायदा देशात आणताना ज्या चर्चा झाल्या त्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही असं म्हणालेत. यावर संसदेत देखील फार चर्चा झाली नाही असं मोदी म्हणालेत. दरम्यान आम्ही सरकारला याबाबतच्या दुष्परिणामांची माहिती दिली होती. राष्ट्रपतींनी देखील आपल्या अभिभाषणात त्याचा उल्लेख केला होता. यानंतर नरेंद्र मोदी यांचं CAA बाबत काहीही चर्चा झाली नाही सांगणे,  हे अत्यंत चुकीचं आहे असं शरद पवार म्हणालेत. 

हेही वाचा : रेल्वे स्टेशनवर चक्क कंगणाच देतेय़ तिकीट, पाहा व्हिडीओ !

केंद्रातील पॉवर आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपला स्वीकारले नाही त्याबद्दल झारखंडच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी धन्यवाद दिले आहेत. आज सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

reaction of sharad pawar after results of jharkhand state assembly