कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिम, नाट्यगृह, चित्रपटगृह, जलतरण तलाव राहणार बंद - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

मुंबई - जगभरात कोरोनाची दहशत आहे. अशात चीन नंतर इटली आणि इराणमध्ये मोठ्या  प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग फोफावलाय. दिवसागणिक या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतातय. अशात कोरोनाने भारतात आणि अनुषंगाने महाराष्ट्रात देखील धडक दिलीये. महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधित पॉझिटिव्ह केसेस वाढताना पाहायला मिळतायत. अशात आज विधानसभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेलय काही निर्णयांची माहिती सभागृहात दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरात आज रात्रीपासून हे नियम लागू होणार आहेत. 

मोठी बातमी - लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ' वादाच्या भोवऱ्यात, वाचा काय आहे प्रकरण...

महाराष्ट्रात सध्या १७ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण​

महाराष्ट्रात सध्या १७ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. अशात पुढील धोका टाळण्यासाठी एपिडेमिक डिसीज ऍक्ट १८९७ कलम २ अंतर्गत राज्यसरकारने अधिसूचना जारी केलीये. यामध्ये व्यक्तींची मोठी गर्दी टाळणे, वेळोवेळी हात धुणे, हस्तांदोलन या ऐवजी दुरून नमस्कार करणे असे सोपे पर्याय अवलंबायला हवेत असं सांगण्यात आलंय. 

जिम, व्यायाम शाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह आणि जलतरण तलाव बंद

पुढील आदेश येईपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरात जिम, व्यायाम शाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह आणि जलतरण तलाव बंद ठेवण्यात येतील. शाळांच्या बाबतीत देखील सरकारने मोठा निर्णय घेतलाय. जनतेमधील भीती पाहता दहावी आणि बारावी परीक्षांशिवाय पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. 

एक नंबर ! कोरोनावर 'तिने' केली मात, वाचा त्या 'फायटर' महिलेची फेसबुक पोस्ट...

अनावश्यक प्रवास टाळावा

जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा गर्दी टाळावी, मॉल्स, हॉटेल्स याठिकाणी जाणं टाळावं, असं सांगण्यात आलंय. सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने या सेवा बंद करण्यात आलेल्या नाहीत. सरकारकडून घेण्यात येणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात येऊ नये, या कार्यक्रमांना सरकारकडून परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान या आधी दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात येणार आहेत. 

घरून काम करण्याची सुविधा देण्यात यावी

खासगी कंपन्या आणि त्यांच्या मालकांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तेथे वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची सुविधा देण्यात यावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. या शिवाय सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीप्रमाणे कोरोनाबद्दल प्रबोधन करणारी माहिती देखील नागरिकांना देण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणालेत. 

corona alert gym cinemahalls theaters swimming pools to remain close in maharashtra  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona alert gym cinemahalls theaters swimming pools to remain close in maharashtra