एक नंबर ! कोरोनावर 'तिने' केली मात, वाचा त्या 'फायटर' महिलेची फेसबुक पोस्ट...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

मुंबई: जगभरात सध्या कोरोनाविषयी जनतेच्या मनात धास्ती आहे. कोरोनानं आतापर्यंत ४५०० लोकांचा जीव घेतला आहे. संपूर्ण जगात यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. एका कोरोनाबाधित महिलेनं ती बरी झाल्यानंतर ही पोस्ट केली आहे. यात तिनं जगभरातल्या लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं आहे. 

मुंबई: जगभरात सध्या कोरोनाविषयी जनतेच्या मनात धास्ती आहे. कोरोनानं आतापर्यंत ४५०० लोकांचा जीव घेतला आहे. संपूर्ण जगात यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. एका कोरोनाबाधित महिलेनं ती बरी झाल्यानंतर ही पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं जगभरातल्या लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं आहे.  या महिलेनं तिला कोरोना झाल्यानंतर तिनं स्वतःची कशी काळजी घेतली आणि काय खबरदारी घेतली याबद्दलचा अनुभव सांगितला आहे. ही पोस्ट फेसबुकवर तब्बल २१००० पेक्षा जास्त लोकांनी शेयर केली आहे. 

हेही वाचा: महाविकास आघडीत राष्ट्रवादीचं वर्चस्व; राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीकडे 

कोण आहे ही महिला:

'एलिझाबेथ स्नायडर' असं या महिलेचं नाव आहे. ही महिला सिएटलमधली आहे. फेसबुक पोस्टमध्ये कोरोनाची लागण झाल्यावर कोणती लक्षणं दिसली आणि त्यासंबंधीच्या चाचण्या कशा प्रकारे केल्या या विषयी तिनं माहिती दिली आहे.

हेही वाचा: "माझ्या घोषणांमुळेच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी"- रामदास आठवले 

काय लिहिलंय पोस्टमध्ये:

फेसबुक पोस्टमध्ये  एलिझाबेथ म्हणाली,  "कोरोना टाळण्याासाठी लवकर वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजे. योग्य ती काळजी घेतल्यामुळे कोरोना नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षणं आढळली तर लगेच डॉक्टरांकडे जा असं आावाहन तिनं केलं आहे. कोरोनातून मी आता बरी झाली आहे आणि मी आपले नियमित कामं सुरू केले आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे विनाकारण घाबरून जाण्याचं कारण नाही. वेळेत उपचार होणं आणि आवश्यक औषधं घेणं महत्वाचं आहे. तसंच  विश्रांती घेतल्यामुळे कोरोनातून आपण बरे होऊ शकतो" असंही एलिझाबेथनं म्हंटलं आहे.

woman who survived from Corona posted her experience on facebook read full story
        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman who survived from Corona posted her experience on facebook read full story