सिनियर सिटिझनन्स 'या' पदाथांचं सेवन करून वाढवू शकतात रोगप्रतिकारक क्षमता

सिनियर सिटिझनन्स 'या' पदाथांचं सेवन करून वाढवू शकतात रोगप्रतिकारक क्षमता

मुंबई: सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. जागत तब्बल ३३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय. यात बहुतांश लोकं सिनियर सिटिझन्स म्हणजेच वयाची ६० वर्ष पूर्ण केलेले आहेत. वयाच्या ६० वर्षानंतर रोग प्रतिकारक क्षमता कमी होत जाते. म्हणूनच कोरोनामुळे ६० वर्षांच्या वरच्या नागरिकांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. भारतातही आतपर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये बहुंतांश मृत्यू हे ६०-६५ वयोगटाच्या व्यक्तींचे आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली रोग प्रतिकारक क्षमता चांगली ठेवली पाहिजे असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

तुम्ही स्वतः किंवा तुमच्या आसपास जेष्ठ नागरिक असतील तर तर आता घाबरून जाऊ नका. कारण आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यांचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढवू शकणार आहात आणि निरोगी राहू शकणार आहात. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाहीये. हे सगळे पदार्थ तुमच्या घरीच उपलब्ध असणार आहेत.

(१) फळं:

आंबट फळं म्हणजे लिंबू, मोसंबी, संत्र, द्राक्षं ही फळं खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढते. तसंच स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळेही इम्युनिटी वाढते. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतं. तसंच कोल्ड कफपासून संरक्षण करण्यासाठी ही फळं खाणं महत्वाचं आहे.

(२) फळभाज्या:

ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतं. त्याशिवाय ब्रोकोलीमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. म्हणून रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ब्रोकोली लाभदायी आहे. तसंच लाल शिमला मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणावर बीटा केरोटीन असतं. ज्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. लाल शिमला मिरचीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

(३) डाळ आणि कडधान्य:

निरनिराळ्या डाळिंचं आपल्या दैनंदिन आहारात सेवन केल्यामुळे तसंच कडधान्यांचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढवू शकता.

(४) भोपळ्याची बी:

भोपळ्याच्या बियांमध्ये  अँटिऑक्सिडंट आणि ऐंटिइंफ्लामेट्री तत्व असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. तसंच यामुळे हृदयविकार आणि ब्लड प्रेशरपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकतात.

(५) जवस:

दररोज  जवसाच्या चटणीचं किंवा जवसाच्या बियांचं सेवन केलूमुळे तुमच्या शरीरात व्हाईट ब्लड सेल्स वाढतात जे तुम्हाला कोणत्याही व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.

(६) जेष्ठमध:

जेष्ठमधात अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला होत नाही किंवा आला तर लगेच बरा होतो. त्यामुळे जेष्ठमधाचं नियमित सेवन तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत करतं.

(७) हळद:

हळद ही अँटिबायोटिकचं काम करते हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र हळदीत असलेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

अशा काही पदार्थांचं सेवन केल्यामुळे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.

these food items will increase immune system of senior citizens during corona crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com