esakal | तासाभरात करता येणार कोरोनाचे निदान, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या 'टेस्ट'ची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

sorting test

कोव्हिड 19 रुग्णांची वर्गवारी करणे आवश्यक असून लक्षण न दिसणारा रुग्ण ही पॉझिटीव्ह असल्यास ते संसर्ग पसरवू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

तासाभरात करता येणार कोरोनाचे निदान, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या 'टेस्ट'ची निर्मिती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोव्हिड 19 रुग्णांची वर्गवारी करणे आवश्यक असून लक्षण न दिसणारा रुग्ण ही पॉझिटीव्ह असल्यास ते संसर्ग पसरवू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. या शक्यतेतून मुंबईतील एका ज्येष्ठ संशोधक डॉक्टरने कोरोना पॉझिटीव्ह की निगेटीव्ह अहवाल देणाऱ्या नव्या चाचणीचा दावा केला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचणी अहवालानुसार, 80 टक्के खात्री हे डॉक्टर देतात. 

नक्की वाचा : उत्तर प्रदेश सोशल मीडिया डेस्कला धमकी देणारा आला गोत्यात, महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यातून अटक

डॉ. एस. आर. शेणॉय हे गेली 42 वर्षे या क्षेत्रात आहेत. कोरोना काळ सुरु झाल्यापासून या आजाराचे निरीक्षण त्यांनी केले. यावेळी कोरोना चाचणी उशिरा होत असल्याच्या तक्रारी दिसून आल्या. यावर कोरोना चाचणीला समांतर अशी सॉर्टींग टेस्ट सुरु केली. ही चाचणी कोरोना टेस्टशी बरेचसे साधर्म्य राखणारी आहे. शिवाय, ही चाचणी पॉझिटीव्ह असल्यास कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह येते. याबाबीची 80 टक्के खात्री असल्याचे डॉ. शेणॉय यांनी सांगितले.  बहुतांश वेळा कोरोना टेस्ट पहिल्या दोन वेळा निगेटीव्ह येऊन तिसऱ्या वेळेस पॉझिटीव्ह येते. अशा वेळी टेस्टची देखील विश्वासर्हता धोक्यात येते. सॉर्टींग टेस्ट मात्र रॅपिड टेस्टहून अधिक खात्रीलायक असल्याचे डॉ. शेणॉय यांनी सांगितले आहे. सध्याचा कोरोना काळ चाचण्या करण्यात अधिक व्यतित होतो. शिवाय खासगी रुग्णालये आणि लॅब विनाकारण पैसा लुबाडत असतात. अशात अशा प्रकारची चाचणी करुन सर्वसामान्य रुग्ण निश्चिंत होऊन अहवालानुसार आगामी उपचारासाठी तत्पर होऊ शकतो. 

हे ही वाचारेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

वैशिष्ट्य - 

  • अहवाल एक तासात
  • कोव्हिड, नॉन कोव्हिड रुग्णाची ओळख त्वरित
  • कमी दरात चाचणी
  • संसर्ग रोखण्यास मदत

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

अगदी 100 रुपयात ही चाचणी होते. फार कमी वेळ लागतो. त्वरीत समजल्याने रुग्ण आजाराचा वाहक होत नाही. तशी तो काळजी घेतो. सॉर्टींग टेस्ट बद्दल सरकार सोबत बोलणे सुरु आहे. 
- डॉ. एस. आर. शेणॉय, ज्येष्ठ संशोधक

Corona can be diagnosed in an hour, creating a test that is affordable to all

loading image
go to top