कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 May 2020

मुंबईत प्रत्येक विभागामध्ये मागील 7 दिवसात आढळून आलेल्या रुग्णाची संख्या एकत्र करुन, त्या विभागाची सरासरी दैनंदिन रुग्णवाढ संख्या नोंद केली जाते.

मुंबई : मुंबईत कोविड19 संसर्ग वेगाने आपले हात पाय पसरत असून मुंबईतील रुग्णांची संख्या 30 हजार पार झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर हा देखील वाढला असून तो 6.61 इतका झाला आहे. हा दर कमी करण्यासाठी पालिकेने आता शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मुंबईत पालिकेचे 24 वॉर्ड असून त्यातील 8 वॉर्डमधील रूग्णवाढीचा दैनंदिन दर हा 8 टक्क्यांवर आहे. आर दक्षिण यामध्ये 9.4%, आर मध्यमध्ये 8.9 %, टी वॉर्डमध्ये 11.9%, पी दक्षिण वॉर्डमध्ये 10.9 %, पी उत्तरमध्ये 11.9 %, एस 10.0, एन वॉर्डात 13.7%, एफ दक्षिण मध्ये 8.2 % या विभागांचा यात समावेश आहे.

तर 16 वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा सरासरी दर हा 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जी दक्षिण यामध्ये 3.4 टक्के, ई वॉर्डमध्ये 4.2 टक्के, एफ उत्तर 4.6 टक्के आणि डी 4.6 टक्के या चार वॉर्ड मधील रुग्णवाढीचा दर हा सर्वात कमी आहे.  

BIG NEWS - शरद पवारांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट. राजकीय पडद्यामागे 'मोठ्या' हालचाली ?

मुंबईतील कोविड 19 रुग्णांचा विभागवार आढावा पालिकेने सुरु केला आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये कोविड19 रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी समवेत रूग्णवाढीच्या सरासरी दरावर देखील लक्ष ठेवले जात आहे.

रुग्णवाढीच्या सरासरी दरामुळे, रुग्णसंख्या कमी असलेल्या एखाद्या विशिष्ट विभागामध्ये, रुग्णांची वाढ होऊ  लागल्यास त्याची तातडीन दखल घेण्यास मदत होते.

या निकषांनुसार रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त अथवा कमी अशा गटांमध्ये विभागांचे वर्गीकरण केले जाते. विशिष्ट विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर 8 टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आल्यास, तेथे प्रतिबंधित क्षेत्राचे कठोरपणे पालन करणे, सुरक्षित अंतर राखण्यासाठी नागरी समुदायाकडुन अधिकाधिक सहभाग मिळवणे, यासाठी कार्यवाही केली जाते. 

Lockdown:: टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवरील बंदी उठवा, मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

कोविड 19 रुग्णवाढीच्या दराविषयी महत्त्वाची माहिती : 

  • प्रत्येक विभागामध्ये मागील 7 दिवसात आढळून आलेल्या रुग्णाची संख्या एकत्र करुन, त्या विभागाची सरासरी दैनंदिन रुग्णवाढ संख्या नोंद केली जाते.
  • विशिष्ट विभागामध्ये प्रतिदिन रुग्णवाढीचा दर म्हणजे, मागील दिवसाच्या तुलनते त्या विभागात झालेल्या  एकूण रुग्णवाढीची टक्केवारी काढली जाते.
  • याच पद्धतीने, सर्व विभागांमध्ये वाढलेल्या एकूण रुग्णांची संख्या विचारात घेऊन सर्वसाधारण रुग्णवाढीचा दर गणला जातो.
  • दरम्यान मुंबईत दिनांक 16 मे 2020 ते 22 मे 2020 या कालावधीत कोविड 19 वाढीचा सर्वसाधारण सरासरी दर हा 6.61 टक्के इतका आहे.

covid 19 patients count rate is increasing in mumbai patients count rate jumped by more than 6 percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 patients count rate is increasing in mumbai patients count rate jumped by more than 6 percent