esakal | कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चिनी नागरिकांची शोधमोहीम...
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चिनी नागरिकांची शोधमोहीम...

कोरोनाची दहशत ! नवी मुंबईत चिनी नागरिकांची शोधमोहीम...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : चीनमध्ये थैमान घातलेल्या आणि जगभरात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची नवी मुंबई शहरातदेखील दहशत वाढत चालली आहे. या विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे शहरातील चिनी नागरिकांची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे. सानपाडा व पारसिक हिल येथील दोन सोसायट्यांमधील चिनी कुटुंबांची आरोग्य विभागाने तपासणी केली. 

मोठी बातमी - ' साथीच्या आजारांचा नशेबाज 'असा' उचलतायत फायदा...

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे भारतातही आरोग्य यंत्रणा तत्परतेने काम करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील सर्व आरोग्य यंत्रणांनी राज्यातील प्रमुख शहरांमधील आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी होऊन कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा भडका उडाल्यानंतर देशातील सर्वच विमानतळांवर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विशेष चाचणी केली जात आहे. त्यानंतर संशयित आढळल्यास त्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल केले जात आहे.

त्याच धर्तीवर मुंबईजवळचे उपनगर असणाऱ्या नवी मुंबईतही परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत आहेत. नेरूळ आणि खारघर येथे असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्यासाठी चीनमधून बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. तसेच ठाणे एमआयडीसीत असणाऱ्या आयटी कंपन्या आणि वाशी, बेलापूर येथील आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमध्येही कामासाठी चीनमधील नागरिक येतात. शिक्षण व कामानिमित्त आलेले बरेचसे चिनी नागरिक नेरूळ, सानपाडा, वाशी, खारघर भागातील काही रहिवासी इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत. 

मोठी बातमी -  'असा' पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...

चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे या नागरिकांना आपल्या इमारतींमध्ये राहत असलेले पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे चिनी नागरिक राहत असलेल्या सोसायट्यांमधील रहीवाशांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. आरोग्य विभागाला सानपाडा व नेरूळमधील पारसिक हिल अशा दोन ठिकाणांहून चीनी नागरीकांची तपासणी करण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ आपली पथके पाठवून, संबंधित चिनी कुटुंबीयांची तपासणी पूर्ण केली. या तपासणीअंती कोणत्याच चिनी नागरिकांनी कोरोना विषाणूची लागण नसल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

शहरात आत्तापर्यंत 6 जणांची तपासणी 
महिनाभरात चीनहून आलेल्या अथवा चीनमधील शहरांशी संबंधित असणाऱ्या सहा चिनी नागरिकांची पालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली. सहा जणांमध्ये एक वर्षाच्या लहान चिमुकल्याचाही समावेश आहे; तर इतर पाच जण 23 ते 31 वयोगटातील नागरिक आहेत. या सर्वांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे तपासण्यात आले असता, ते कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले. 

corona chaos navi mumbai health department is looking for Chinese citizens in the city 

loading image