esakal | कहर ! साथीच्या आजारांचा नशेबाज 'असा' उचलतायत फायदा...
sakal

बोलून बातमी शोधा

कहर ! साथीच्या आजारांचा नशेबाज 'असा' उचलतायत फायदा...

कहर ! साथीच्या आजारांचा नशेबाज 'असा' उचलतायत फायदा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या वातावरणात अनेक बदल होतायत. यामुळे अनेकांच्या सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढू लागतात. अशात खोकला आणि सर्दीसारख्या लक्षणांमुळे होणाऱ्या कोरोना व्हायरसची देखील दहशत आहे. अशात कफ सिरपच्या खपात वाढ झालीये. कारण या परिथितीचा गैरफायदा नशेबाज मंडळी घेतली. अनेकदा नशेडी लोकं कफसिरप  नशेसाठी वापरात. मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडघा उगारल्याने ड्रग्ज सहजासहजी मिळणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे गर्दुल्यांसह उच्चभ्रू तरुणांमध्येही कफ सिरपची मागणी वाढत आहे. असाच 7 हजार प्रतिबंधीत औषधांच्या बाटल्यांचा साठा मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विभागाने हस्तगत केला आहे. 

मोठी बातमी - 'असा' पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...

अंमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज पुरविणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ड्रग्जची मुंबईतील अवाक कमी झाली आहे. त्यामुळे नशा करण्यासाठी तरुण कफ सिरपचा सर्रास वापर करत आहेत. मुंबईच्या अंमली पदार्थ विभागाच्या घाटकोपर कक्षाने पोलिस उपायुक्त शिवदीप लांडेंच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक कारवाई केली. या कारवाई दरम्यान 29 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी साकीर मोहम्मद हुसेन रेतीवाला याच्याजवळून 400 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या हस्तगत केल्या, त्याच्या चौकशीत पुढे पोलिसांनी कुर्लातून 6640 नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत. या बाटल्यांची किंमत 13 लाख 28 हजार इतकी आहे. 

या कारवाई दरम्यान पोलिसांनी मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊड येथून एका तरुणाला 17 किलो गांजासह अटक केली. रबीउल हसन याकूब शेख (22) असे या आरोपीचे नाव आहे. बाजारात या गांजाची किंमत 3 लाख 40 हजार इतकी आहे. या दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. 

VIDEO : आजींच्या अंगावरून धडधडत गेली मालगाडी, आजी मात्र दोन पायांवर उभ्या...

प्रतिबंधित गोळ्यांचेही सेवन, कफ सिरप बरोबरच प्रतिबंधित गोळ्यांचे सेवन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात करत आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत अल्फाझोलाम गोळ्यांच्या 1,286 स्ट्रिप्स जप्त करण्यात आल्या असून याची किंमत दोन लाख 53 हजार रुपये इतकी आहे. 47 हजार रुपये किंमतीच्या नेत्रावेट या गोळ्यांच्या 94 स्ट्रिप्स हस्तगत करण्यात आल्या असून या गोळ्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी केल्या जात आहेत.

increase in cough syrup sale addicts are buying more bottles of these syrups  

loading image
go to top