esakal | 'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...

'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे  पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्रश्न उद्भवतोय  कोरोनाला सामोरं जाण्यास आपण तयार आहोत का ?  सरकारकडून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असं आवाहन करण्यात येतंय. मात्र या व्यतिरिक्त स्वतः काळजी घेणं महत्त्वाचं ठरेल.  

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांचे 'हम नही सुधरेंगे'..  

कोरोना कसा पसतरतो ? एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना होतो का? कुणाला स्पर्श केल्यामुळे होतो का? असे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील. याबद्दल प्रचंड अफवा सोशल मीडियातून पसरवल्या जात आहेत. मात्र आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.

कसा पसरतो कोरोना व्हायरस? 

एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे:

तुमच्या आजूबाजूला कोणी कोरोना बाधित असेल आणि तुम्ही त्यांच्या ६ फुट किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर असाल तर तुम्हाला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या रुग्णांपासून अंतर ठेवणं महत्वाचं आहे.  

खोकला आणि शिंकेमुळे:

खोकला किंवा शिंकण्याने कोरोना पसरतो. त्यामुळे बाहेर जाताना तोंडावर रुमाल ठेवा आणि कोणाला सर्दी, खोकला असेल त्यांच्या संपर्कात राहू नका. 

#Coronavirus: मुंबईत संशयतांची कसून तपासणी! यंत्रणा हायअलर्ट वर.. 

कोरोना हवेतून पसरतो ?  

संक्रमित हवेमुळे कोरोना पसरतो. त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूचा कुणीही सतत शिंकत असेल किंवा खोकलत असेल तर तुम्हाला सांभाळून राहण्याची गरज आहे. कारण त्यांच्या खोकल्यातून हवा संक्रमित होते आणि त्यानंतर तुम्हालाही कोरोना होऊ शकतो. 

स्पर्श केल्यामुळे:

जो व्यक्ति कोरोना बाधित आहे त्याला स्पर्श केल्यामुळे किंवा त्यानं स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यामुळेही कोरोना होऊ शकतो. त्यामुळे अशा वस्तूंना स्पर्श करू नका आणि कोरोनापासून स्वत:चं रक्षण करा. 

मांसाहार केल्यामुळे:

अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा मांसाहारी पदार्थ धुवून न खाल्ल्यामुळेही कोरोना पसरतो. त्यामुळे अर्धवट शिजलेले मांसाहारी पदार्थ न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 

या सर्व कारणांमुळे कोरोना पसरू शकतो. भारतात अजूनही कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही. मात्र आपण सर्वांनी याबद्दल खबरदारी घेणं आवश्यक आहे.    

this is how corona virus is being spread in india read full story        

loading image
go to top