मुंबईत कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक? कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

मिलिंद तांबे
Sunday, 22 November 2020

शनिवारी 1,092 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,74,572 झाली आहे. काल 17 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 10,654 वर पोहोचला आहे. काल 1,053 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,51,509 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबई: कोरोनानं सर्वत्र हैदोस घातला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबईत काही महिन्यांपूर्वी कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र आता पुन्हा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी 1,092 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,74,572 झाली आहे. काल 17 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 10,654 वर पोहोचला आहे. काल 1,053 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,51,509 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 280 दिवसांवर गेला आहे.  20 नोव्हेंबर पर्यंत एकूण 17,57,666 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.25 इतका आहे.

अधिक वाचाभारती सिंग पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही NCBकडून अटक, 18 तास चौकशी
 

मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 17 मृत्यूंपैकी 15 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 12 पुरुष तर 5  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 6 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 11 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

अधिक वाचा-  पवईजवळ टनल बोअरींग मशिन अडकली; मुंबईपासून जर्मनीपर्यंतच्या तज्ज्ञांना पडला पेच
 

मुंबईत 362 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 3,929 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 4,230 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून शनिवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 436 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona condition again critical Mumbai number increasing 1092 new patients found Saturday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona condition again critical Mumbai number increasing 1092 new patients found Saturday