ठाणे जिल्ह्यातील कोरोना आटोक्‍यात! 8 हजार रुग्ण बरे 

राहुल क्षीरसागर 
Tuesday, 27 October 2020

दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, या आजारातून पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सहा महापालिका आणि ग्रामीण भागातील उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 18 हजारांच्या घरात असलेली रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 10 हजारांवर आली आहे.

ठाणे  ः दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, या आजारातून पूर्णपणे बरे होऊन स्वगृही परतणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सहा महापालिका आणि ग्रामीण भागातील उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 18 हजारांच्या घरात असलेली रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 10 हजारांवर आली आहे. त्यामुळे मागील 26 दिवसांत सुमारे 8 हजार रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवीत स्वगृही परतले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णाची संख्या आटोक्‍यात येत असून जिल्ह्याचे आरोग्य सुधारत असल्याचे दिसून येत आहे. 

नैना प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामावर कारवाई नाही; सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

ठाणे जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागावरील ताण वाढत होता. अशा परिस्थितही आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस रुग्णांच्या संख्येत होणारी घट, रुग्ण बरे होण्याचे वाढते प्रमाण, रुग्णालयातील रिक्त खाटांच्या रूपात दिसून येत आहे. 
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण आणि भिवंडी या पाच तालुक्‍यांतील ग्रामीण क्षेत्रात 1 ऑक्‍टोबर रोजी 17 हजार 627 रुग्ण विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल होते. 2 ऑक्‍टोबर रोजी यामध्ये 150 ते 200 रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर जिल्ह्यात जसा रुग्णवाढीचा वेग मंदावत गेला, तसे दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. त्यामुळे उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची संख्यादेखील रोडावत गेल्याने 26 ऑक्‍टोबरला जिल्ह्यात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची 10 हजारांवर येऊन ठेपली आहे. 

नवी मुंबईच्या विकासाला बुस्टर; प्रकल्पांना गती देण्यासाठी ६५० कोटींचा खर्च

10 हजार रुग्णांवर उपचार सुरू 
ठाणे जिल्ह्यात 1 ऑक्‍टोबरला उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 17 हजार 627 इतकी होती; तर 2 ऑक्‍टोबरला त्यात वाढ होऊन 17 हजार 838 वर गेली. त्यात 3 ऑक्‍टोबरला ती 17 हजार 548 वर गेली. तसेच 10 ऑक्‍टोबरला ती 16 हजार 359 वर येऊन पोहोचली; तर 26 ऑक्‍टोबरपर्यंत ती 10 हजार 737 वर येऊन पोहोचली आहे. 

 Corona control in Thane district

(संपादन ः रोशन मोरे) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona control in Thane district