esakal | दोन्ही डोस घेतलेल्या 9 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection

दोन्ही डोस घेतलेल्या 9 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  कोरोनाशी सुरू असलेल्या युद्धात (Corona) लस हे सर्वात मोठे शस्त्र आहे, परंतु, मुंबईत आतापर्यंत एक आणि दोन्ही डोस घेतल्यानंतर (corona vaccination) सुमारे 23,000 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेच्या निरीक्षणानुसार (BMC Survey), ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस (corona two vaccine) घेतले ते लवकर बरे झाले आहेत शिवाय, त्यांच्यात सौम्य संसर्ग आढळून आला आहे.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर किती जणांना संसर्ग झाला आहे? याची माहिती  महानगरपालिका वाॅर्ड स्तरावर गोळा करुन अभ्यास करत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, गोळा करण्यात आलेल्या अहवालापैकी 9001 नागरिक दोन्ही डोस घेतल्यानंतरही संक्रमित झाले आहेत. तर, एकूण 23 हजारांहून अधिक नागरिक पहिला आणि दोन्ही डोस घेऊनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर, पहिला आणि एक डोस घेतल्यानंतर तीन वयोगटातील 14,239 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 23000 लोकांना लस घेतल्यानंतर संसर्ग झाला आहे, यामध्ये पहिला डोस आणि दोन्ही डोस घेणाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांनी लसीचा फक्त एक डोस घेतला होता त्यांना जास्त त्रास झाल्याचे आढळून आले आहे. दुसरा वर्ग म्हणजे इतर  आजारांशी लढणारे नागरिक. लस घेतल्यानंतर काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, परंतु हा आकडा खूपच कमी आहे. डेटा गोळा करण्याचे आणि विश्लेषणाचे काम सुरू आहे.

हेही वाचा: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी लादणे थांबवा; मराठी एकीकरण समितीचा निषेध

दोन्ही डोस घेतलेले

वयोगट         नागरिक

18 ते 44     1,835

45 ते 59       2,687

60 वर्षांपर्यंत  4,479

एकूण            9001 

पहिला डोस घेतलेले

18 ते 44       4,420

45 ते 59       4,815

60 वर्षांपर्यंत  5,004

एकूण          14, 239

18 ते 44 वयोगटातील 31 लाख 76 हजार 344  नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यापैकी 0.14 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत. तर, 45 ते 59 वयोगटातील 6 लाख 70 हजार 716 नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यातील 0.72 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत, तर, 60 वर्षांखालील 3 लाख 28 हजार 680 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून त्यातील 1.52 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत.

तर, दोन्ही डोस घेतलेल्या 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 93 हजार 686 नागरिकांपैकी 0.26 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले, त्यापाठोपाठ, 45 ते 59 वयोगटातील 10 लाख 88 हजार 244 नागरिकांनी दोन्हो डोस घेतला त्यातील 0.25 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत, तर, 60 वर्षांखालील 7 लाख 57 हजार 699 नागरिकांचा दोन्ही डोस पूर्ण झाला असून त्यातील 0.59 टक्के नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे, नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

loading image
go to top