Corona Case Studty : साक्षात देवदूत बनून आला पोलिस !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

मुलाच्या विनंती वरुन वृध्द आजारी आईला मदतीचा हात

दहिसर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात पोलिस दल दिवस-रात्र मेहनत घेत असताना त्यांच्यातील माणुसकीचे दर्शनही दिसून येत आहे. दहिसर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस दिनेश माठेकर यांनी कोणतीही ओळख नसताना एक गरजू वृद्ध महिलेस वेळेवर औषध उपलब्ध करून  खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे. 

मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कळवा सिल, फक्त मेडिकल स्टोअर्स राहणार सुरु

दोन दिवसांपूर्वी दुपारी कोचीन वरून सचिन नामक व्यक्तीचा फोन माठेकर यांना आला होता. आपला मोबाईल नंबर त्यांना कसा मिळाला माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. आपली 80 वर्षीय आई अशोकवन गोकुळ आंनद हॉटेलच्या बाजूला असलेल्या उपहार सोसायटीमध्ये एकटीच राहते. तिला औषधोपचाराची फार गरज आहे, आपण कृपया मदत करावी असे त्यांना सचिनने मोबाइलवर सांगितले. एकीकडे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, अशा वेळी वृद्ध महिलेला औषधाची गरज आहे हे लक्षात घेत माठेकर तात्काळ त्यांच्या घरी गेले. 

मोठी बातमी  मंगळवारपासून उल्हासनगर शहर कडकडीत बंद, आयुक्तांनी दिले "हे आदेश"

त्यानंतर त्यांच्या औषधांची फाईल घेत त्यांनी बोरिवली गाठले, परंतु गोळ्या मिळाल्या नाहीत. मग ज्या डॉक्टरकडे महिलेचे उपचार सुरू आहेत त्या कांदिवली डहाणूकरवाडी येथील डॉक्टर मेहता यांच्याकडे जाऊन त्यांना औषधे मिळाली. त्यांनंतर माठेकर यांनी सदर महिलेला औषधे दिली. त्या मातेने दिलेला आशीर्वाद मी जीवनात कधीही विसरणार नसल्याचे माठेकर यांनी सांगितले. 

घरीच थांबा कोरोनाला हरवा

एक चांगले काम केले याचे मनाला समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कोरोनाच्या युद्धात पोलीस आजही तुमच्या मदतीला आहे. कृपा करून आपणही पोलिसांना सहकार्य करा. घरीच थांबा कोरोनाला हरवा असे आवाहन माठेकर यांनी नागरिकांना केले आहे.

corona crisis in mumbai mumbai police sets excellent example of humanity


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona crisis in mumbai mumbai police sets excellent example of humanity