कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कळवा सिल, फक्त मेडिकल स्टोअर्स राहणार सुरु

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंग नियम पाळले जात नाहीत आणि लहान-सहान गोष्टी खरेदी करण्यासाठी कळव्यातील नागरिक घराबाहेर पडतायत. या पार्श्वभूमीवर कळव्यात कोरोनाचा आणखी संसर्ग वाढू नये म्हणून आता संपूर्ण कळव्याला सिल केलं गेलंय. 

मुंबई - महाराष्ट्रात वेगाने कोरोनाचं संक्रमण होतंय अशी चिन्हं आता दिसायला लागली आहेत. याचं उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा. आज दिनांक ६ एप्रिल रोजी एकट्या महाराष्ट्रात तब्ब्ल १२० नवीन रुग्ण आढळून आलेत. आज ७ जणांचा महाराष्ट्रात कोरोनामुळे मुत्यू देखील झालाय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून आता सरकारकडून आणखी कठोर पावलं उचलण्यास सुरवात करण्यात आली आहे.

मोठी बातमी - महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

मुंबईतील अनेक भाग महापालिकेने सिल केलेत. मुंबईतील अनेक भाग हे कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेत. मुंबईत तब्बल ८ असे हॉटस्पॉट आहेत जिथे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मुंबईनजीकच्या ठाण्यातील कळव्यात या आधी १० आणि आज आणखी २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलंय.

नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंग नियम पाळले जात नाहीत आणि लहान-सहान गोष्टी खरेदी करण्यासाठी कळव्यातील नागरिक घराबाहेर पडतायत. या पार्श्वभूमीवर कळव्यात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून आता संपूर्ण कळवा सिल करण्यात आलाय. त्यामुळे आता कळव्यातील कुणालाच घराबाहेर पडता येणार नाहीये. कळव्यामधील केवळ मेडिलक स्टोअर्स सुरु राहतील. जीवनावश्यक गोष्टी या प्रशासनाकडून नागरिकांना पुरवण्यात येतील अशी देखील माहिती समोर येतेय. 

मोठी बातमी - लॉकडाऊनमध्ये कार सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स 

दरम्यान कळव्याप्रमाणे मुंब्रा हा भाग देखील सिल केला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे. 

due to increase in corona cases complete kalawa is now sealed only medical stores will be opened

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to increase in corona cases complete kalawa is now sealed only medical stores will be opened