esakal | धक्कादायक ! मुंबईत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 'इतके' बळी
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ! मुंबईत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 'इतके' बळी

इतर देशांच्या तुलनेत भारतात नॉवेल कोरोना व्हायरसच्या कोविड १९ मुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा मोठा नाहीये.

धक्कादायक ! मुंबईत आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाचे 'इतके' बळी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १२०० जवळ पोहोचला आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल २२० कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सदर आकडेवारी ३० मार्च रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची आहे. आज मुंबईत एका ८० वर्षांच्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 
 
इतर देशांच्या तुलनेत भारतात नॉवेल कोरोना व्हायरसच्या कोविड १९ मुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा  मोठा नाहीये. मात्र महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल १० लोकांचा जीव गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हे चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र सरकारकडून सतत लोकंना घराबाहेर न पडण्याचं  आवाहन केलं जातंय. तसंच आरोग्य सेवा अधिकाऱ्यांना, पोलिसांना योग्य ते सहकार्यही केलं जात आहे.

दिलासादायक ! आता वीजबिल भरण्यास उशीर झाला तरीही कनेक्शन कापलं जाणार नाही, दंड देखील नाही

आज मुंबईत एका ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही व्यक्ती मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना वार्डात उपचार घेत होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येतेय. त्यामुळे हा महाराष्ट्रात कोरोनाचा दहावा मृत्यू आहे.  दरम्यान राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. सदर कोरोनाबाधित रुग्णाला डायबिटीस आणि हायपर टेन्शनची हिस्ट्री असल्याचं समजतंय. 

राज्यात कुठे किती रुग्ण:

  1. मुंबई - ९२
  2. पुणे (शहर आणि ग्रामीण ) - ४३
  3. सांगली २५
  4. मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा २
  5. नागपूर १६
  6. यवतमाळ
  7. अहमदनगर
  8. सतार कोल्हापूर
  9. औरंगाबात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव , बुलडाणा नाशिक - प्रत्येकी  
  10. इतर राज्य - गुजरात

corona crisis seventh death due to covid19 in mumbai read full story 

loading image