esakal | कॉकटेल थेरपी ठरतेय कोविडवर गुणकारी; सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु | corona
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

कॉकटेल थेरपी ठरतेय कोविडवर गुणकारी; सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड आजारावर (corona decease) नवीन उपचार पद्धतीचा प्रयोग सुरु असून कॅसिरीव्हीमॅब आणि इमॅडेव्हीमॅब या दोन औषधांचे मिश्रण (Medicine) उपयोगी पडत असल्याचे समोर आले. त्यामुळे सेव्हन हिल रुग्णालयाने (seven hill hospital) या मिश्रण औषधाचा प्रयोग (patent experiment) सुरु केला. ज्या रुग्णांना हे मिश्रण देण्यात आले ते 48 तासात कोविड लक्षणातून (corona symptoms) मुक्त झाल्याचे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दीड पट रुग्ण अधिक वाढतील ; तज्ज्ञांचा अंदाज

दरम्यान येथे विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी महारुद्र कुंभार यांनी सांगितले की, हे कॉकटेल नैसर्गिक अँटीबॉडीशी साधर्म्य साधणारे असून शरीरात गेल्यावर नैसर्गिक रित्या अँटिबाडी तयार करते. या औषधाचे निरीक्षण मांडणाऱ्या समूहातील तज्ज्ञांच्या मते हे औषध दिल्यावर रूग्ण आठ दिवसात ठणठणीत होऊन घरी होतो. त्यामुळे हॉस्पिटल मधील राहण्याचा कालावधी घटतो. सात दिवसात आरटीपीसीआर निगेटिव्ह येत असल्याचे सांगण्यात आले. सेव्हन हिल्सच्या युनिट इन्चार्ज डॉ. राजस वाळींजकर यांनी सांगितलं की, 506 रुग्णांना औषध देण्यात आले.

यातील निव्वळ तिघांना ऑक्सिजनची गरज लागली. मात्र, हे तिघेही रूग्ण पन्नाशीवरील असल्याचे सांगण्यात आले. शिवाय, त्यांची ऑक्सिजन पातळी अत्यंत कमी होती. हा अहवाल आय सी एम आर ला पाठवला आहे. या रुग्णांना टॉसीलीझूमॅब, रेमेडिसवीर अथवा स्टीरॉईड या पैकी कशाची ही गरज लागली नसल्याचे डॉ. राजस  वाळींजकर म्हणाले. शिवाय, या रुग्णांपैकी कोणाचा मृत्यू झाला नाही की त्यांना व्हेंटिलेटर लागला नाही.

हेही वाचा: ‘कोरोना’ मंदावला पण डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय; जळगावा आहेत इतके रूग्‍ण 

मे महिन्याच्या अखेरपासून ही कॉकटेल अँटिबाडी थेरेपीचा वापर होऊ लागला. ही चांगली उपचार पद्धती असून मात्र योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच वापरणे गरजेचे असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. डॉक्टरने कोणता रूग्ण या थेरेपीसाठी योग्य अयोग्य ते ठरवावे असे ही ते म्हणाले. राज्य कोविड टास्क फोर्स कडून ही थेरेपी वापरासाठी गाईड लाईन काढल्या आहेत जेणे करून त्याचा गैरवापर होणार नाही.

loading image
go to top