esakal | वारकऱ्यांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन; मंत्री अमित देशमुख यांची घोषणा | Amit Deshmukh
sakal

बोलून बातमी शोधा

Amit deshmukh

वारकऱ्यांना महिन्याला पाच हजार रुपये मानधन; मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना काळामध्ये (Corona) अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना (devotees) महिन्याला सरकारकडून (government) पाच हजार रुपये मानधन मिळणार आहे. आज विधान भवनात झालेल्या संतपीठ बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ही घोषणा केली. वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा: डिस्को, बार, आरोग्य केंद्र आहेत का? आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभे राहावे, या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केल्या. त्या वेळी वारकरी साहित्य परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली.

काळाच्या ओघात संतपीठ ही संकल्पना बाजूला गेली होती; पण वारकरी साहित्य परिषदेच्या रूपाने या विषयाला बळ मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्याबाबत आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. वारकऱ्यांना मानधन देण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन वारकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील, असेही थोरात यांनी सांगितले.

व्यसनमुक्तीसाठी मोठमोठे ब्रँड ॲम्बेसिडर आणून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; मात्र आपल्या जगण्या-वागण्यातून माणुसकीची शिकवण देत समाजाला दिशा देण्याचे काम करणारे वारकरी खरे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली. तसेच महाविकास आघाडी सरकार सतत वारकऱ्यांसोबत राहील, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. बैठकीला वारकरी परिषदेचे राज्यभरातील सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष तसेच वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top