ताप आलाय? घाबरू नका... रायगड जिल्‍ह्यात ५२ आरोग्य केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोनावर मात करण्यासाठी रायगड जिल्ह्यात विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. याद्वारे तापसदृश्‍य आजारी व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.

अलिबाग (बातमीदार) : कोरोनावर मात करण्यासाठी रायगड जिल्ह्यात विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. याद्वारे तापसदृश्‍य आजारी व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. 

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार तापसदृश्‍य आजारावर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष 52 प्राथमिक आरोग्य केंद्रे तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत.

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत कोरोनाबाधितांचे अर्धशतक; एकाच कुटुंबातील ६ जणांना लागण

कोरोनाप्रमाणेच इन्फ्लुएंझा एच1 एन1, सारी अशा प्रकारच्या इतरही काही आजारांमध्ये रुग्णाला ताप येतो. त्यामुळे त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्यासाठी आरोग्य केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत. विशेष म्हणजे, विनामूल्य तपासणी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा... मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! एपीएमसी मार्केट होणार सुरू

पोयनाड, पेढांबे, ढोकवाडे, चिखली, रेवदंडा, अलिबाग, आंबिवली, खांडस, मोहिली, कडव, नेरळ, कळंब, कशेळे (ग्रामीण रुग्णालय), कर्जत (उपजिल्हा रुग्णालय), माथेरान, खालापूर, लोहोप, चौक (ग्रामीण रुग्णालय), वावोशी, खोपोली, खालापूर, शिरवली, गोरेगाव, निजामपूर, साई, नंदवी, इंदापूर, माणगाव (उपजिल्हा रुग्णालय), बिरवाडी, विन्हेरे, दासगाव, वारंध, पाचाड, चिंभावे, महड (ग्रामीण रुग्णालय), म्हसळा (ग्रामीण रुग्णालय), मेंदादी, खामगाव, गडब, जिते, कमार्ली, वाशी, पेण (उपजिल्हा रुग्णालय), पनवेल (उपजिल्हा रुग्णालय), पितळवाडी, पालचिल, पोलादपूर (ग्रामीण रुग्णालय), आंबेवाडी, कोकबन, नागोठणे, रोहा (उपजिल्हा रुग्णालय), वालवटी, बोर्लीपंचतन, श्रीवर्धन (उपजिल्हा रुग्णालय), तळा, पाली, जांभूळपाडा, सुधागड, कोप्रोली, उरण (ग्रामीण रुग्णालय ) बोर्लीमंडाळा, आगरदांडा, मुरूड (ग्रामीण रुग्णालय) या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 health center in Raigad District for fever