अरे वाह ! खालापुरात कोरोना योद्धांना पीपीई कीटचं वाटप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गावात कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांना पीपीई कीट वाटप करण्यात आले आहे.

मुंबई : खालापूर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गावात कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांना पीपीई कीट वाटप करण्यात आले आहे.

ही बातमी वाचलीत का? बॉम्बे हायकोर्ट नको, 'हे' नाव ठेवा..माजी न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात याचिका... 

 ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात खालापूर तालुका पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, माजी सभापती कांचन पारंगे, वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सरपंच ताई पवार, उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच कृष्णा पारंगे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, निखील डवले, संतोष चौधरी, ग्रामपंचायत सदस्य श्र्वेता कांबळे, माधुरी जांभळे, सिध्दी कुरंगळे आदी उपस्थित होते.

ही बातमी वाचा: बाप रे!  खासगी लॅबमध्ये येतायत अधिक पॉझिटिव्ह रिपोर्ट्स..सरकारी लॅबपेक्षा 'इतके' टक्के अधिक पॉझिटिव्ह रुग्ण..

 पंचायत समिती सेस निधीतून वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील वासांबे मोहोपाडा, चांभार्ली व लोधिवली या ग्रामपंचायत हद्दीतील स्वच्छता कर्मचारी, रसायनी पाताळगंगाडॉक्टर, रुग्णवाहिकाचालकाना एकूण 210 पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.        

मुंबईच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा....      

distribution of PPE kit in khalapur read full story                 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: distribution of PPE kit in khalapur read full story