कोरोना बरा होतो, तुम्ही फक्त हिंमत ठेवा! कोरोनामुक्त पोलिस अधिकाऱ्याचे उद्गार

दीपक शेलार
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोना आजार बरा होतो, तुम्ही घाबरून जाऊ नका, तसेच तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावर ड्युटी बजावतोय. लॉकडाऊन काळात तुम्ही, फक्त घरी बसून सहकार्य करा, असे भावुक आवाहन केले आहे कोरोना आजारातून बरे होऊन बाहेर पडलेल्या एका पोलीस निरीक्षकाने. गेले काही दिवस कोरोनाशी दोन हात करून बरे होऊन बाहेर पडलेल्या या अधिकाऱ्याचे पोलिस दलाने देखील स्वागत केले.

ठाणे : कोरोना आजार बरा होतो, तुम्ही घाबरून जाऊ नका, तसेच तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावर ड्युटी बजावतोय. लॉकडाऊन काळात तुम्ही, फक्त घरी बसून सहकार्य करा, असे भावुक आवाहन केले आहे कोरोना आजारातून बरे होऊन बाहेर पडलेल्या एका पोलीस निरीक्षकाने. गेले काही दिवस कोरोनाशी दोन हात करून बरे होऊन बाहेर पडलेल्या या अधिकाऱ्याचे पोलिस दलाने देखील स्वागत केले.

क्लिक करा : लोकं अडचणीत आहेत, तुम्ही मात्र प्रसिद्धीसाठी भिकारीच

ठाण्यातील दाट लोकवस्तीतील संवेदनशील गणल्या जाणाऱ्या पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या निरिक्षकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 एप्रिल रोजी या पोलिस निरिक्षकाला होरायझन या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनाशी दोन हात करून पूर्णतः बरे होऊन बुधवारी हा पोलिस अधिकारी घरी परतला आहे. 

क्लिक करा : स्थानिक पातळीवर 'या' टेस्टद्वारे कोरोनावर मात करण्याची तयारी

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलांचा वर्षाव तसेच, पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. मी, पुन्हा जोमाने कामाला लागणार आहे. कोरोना बरा होतो, तुम्ही हिंमत ठेवा, मुळीच घाबरून जाऊ नका. तसेच तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर ड्युटी करतोय. तुम्ही फक्त घरात बसा, असे आवाहन या पोलीस निरीक्षकाने नागरिकांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona heals, you just have to be brave