'मुलूंड' ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट, सात दिवसात एक हजार नव्या रुग्णांची भर

समीर सुर्वे
Friday, 16 October 2020

मुलूंड टी प्रभागात गेल्या सात दिवसात सुमारे 1 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. 6 ऑक्टोबरला या प्रभागात 9793 रुग्ण होते तर 13 ऑक्टोबर पर्यंत 10 हजार 733 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईः  मुलूंड टी प्रभागात गेल्या सात दिवसात सुमारे 1 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. 6 ऑक्टोबरला या प्रभागात 9793 रुग्ण होते तर 13 ऑक्टोबर पर्यंत 10 हजार 733 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ ही टी प्रभागात आहे. या प्रभागात 1.32 टक्के दराने रुग्ण वाढ नोंदविण्यात आली आहे. तर, 13 ऑक्टोबरला या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवसांचा आहे. 6 ऑक्टोबरला हा कालावधी 74 दिवसांचा होता. या प्रभागात 90 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. ऑक्टोबर महिन्या पासून या प्रभागातील रुग्णसंख्या वाढू लागली. 7 आणि 8 ऑक्टोबरला 263 नवे रुग्ण नोंदविंण्यात आले होते. ही सप्टेंबर महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली सर्वाधिक वाढ होती. 

मुंबईतल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवस आणि रुग्ण 

  • 7 - 215
  • 8--248
  • 9 --68
  • 10-132
  • 11-124
  • 12--85 
  • 13--68

मुलूंड हा पूर्व उपनगरातील हॉटस्पॉट असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी
10 ऑक्‍टोबरला 54 दिवसांचा होता. तर,6 ऑक्टोबरला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 74 दिवसांचा होता. अवघ्या तीन दिवसात 20 दिवसांची घसरण झाली आहे. सुरवातीपासून मुलूंड मधील इमारतींमध्येच कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. 6 ऑक्‍टोबरपर्यंत मुलूंड मधील कोविड वाढीचा दर 0.94 टक्के होता. तो आता 1.33 टक्‍क्‍यांवर पोहोचला असल्याचे पालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारी वरुन स्पष्ट होते.

अधिक वाचाः  तेजस ठाकरेंचं आणखी एक संशोधन, सह्याद्रीच्या पर्वत रांगात नव्या प्रजातीचा शोध

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona hotspot Mulund adding one thousand new patients in seven days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona hotspot Mulund adding one thousand new patients in seven days