तेजस ठाकरेंचं आणखी एक संशोधन, सह्याद्रीच्या पर्वत रांगात नव्या प्रजातीचा शोध

मिलिंद तांबे
Friday, 16 October 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला होता. आता तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधली आहे.

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला होता. आता तेजस यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधली आहे. अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या माश्याची ही नवी प्रजाती त्यांनी शोधून काढली आहे. शोधलेली ही प्रजाती या माश्याची २० वी आहे. तर तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. 

याआधी तेजस ठाकरेंनी  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता. तसंच सह्याद्रीच्याच पर्वत रांगामध्ये पालींच्या दुर्मळ प्रजातींचाही त्यांनी शोध घेतला होता. त्यांना आंतरारष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती. 

हिरण्यकेशी माशाचं नाव

तेजस ठाकरे यांनी आता हिरण्यकश नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव 'हिरण्यकेशी' असं ठेवण्यात आलंय. याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा असा आहे. माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना  अंडर वाँटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डाँक्टर प्रविणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत यांचे सहकार्य मिळालं.

अधिक वाचाः  अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, नाहीतर....मनसेचा अॅमेझॉन-फ्लिपकार्टला इशारा

याआधी खेकड्यांच्या प्रजातींचा शोध 

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये तेजस ठाकरे यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध  झाला होता.  तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला आहे.

अधिक वाचाः  आर्थिक राजधानीतील आर्थिक गुन्ह्यांत 70 टक्क्यांनी घट, लॉकडाऊनमध्ये केवळ चारच गुन्हे दाखल

न्यूझीलंडच्या झुटाक्सा हे नियतकालिक आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. पश्चिम घाटातील 'सह्याद्री' या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं सह्याद्रियाना असं नामकरण त्यांनी केलं आहे.

-------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Tejas Thackeray new research discovery species mountain colors Sahyadri


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejas Thackeray new research discovery species mountain colors Sahyadri