ठाण्यात आणखी एका कोरोनाबाधितचा मृत्यू, रुग्णांचा आकडा 100 पार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

ठाण्यातील गार्डन इस्टेट परिसरात राहणाऱ्या ५७ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. 

ठाणे : ठाण्यातील गार्डन इस्टेट परिसरात राहणाऱ्या ५७ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. 

मोठी बातमी :  डहाणूत आणखी ४ जण पाॅझिटिव्ह

गेल्या सहा दिवसांपासून ५७ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीवर होरायझन रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्टरी नव्हती. या रुग्णाला यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर आता कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची माहिती महापालिकेच्या वतीने जमा केली जात आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरनटाईन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत ११५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महत्वाची बातमीमातांनो, आता बाळाची काळजी घ्या!

शहापूरात 1 कोरोनाबाधित 

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या शहापूर तालुक्यात शुक्रवारी (ता. 17) कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. 67 वर्षीय हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले असून, याबाबत गुरुवारी रात्रीपासून आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

corona infected patient dies in Thane, death toll rises to 2


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infected patient dies in Thane, death toll rises to 2