डहाणूत आणखी ४ जण पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

तीन वर्षीय मुलीच्या संपर्कात आलेल्यांना लागण

डहाणू : वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या 3 वर्षाच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील रानशेत भागातील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  

झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

रानशेत ओझर पाडा येथील 45 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, 7 व 3 वर्षांच्या दोन मुली असे एकूण 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या व्यक्ती काटाळे येथील वीटभट्टीवरून परतल्या असल्याने 3 वर्षीय मुलीच्या सहवासात आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे डहाणू तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 7 झाली आहे.

Lockdown 2.0 सुरु राहणारच, पण 20 एप्रिलनंतर सुरु होणाऱ्या गोष्टींवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

गंजाड येथील 3 वर्षीय मुलीच्या संपर्कात आल्याने या चारही जणांचे स्वॅब सॅम्पल कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. डहाणू तालुक्यातील संपर्कात आलेल्या एकूण 12 जणांचे अहवाल मिळाले आहेत. त्यापैकी 4 जणांचे पॉजिटिव्ह तर इतर 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. चारही कोरोनाबाधितांना बोईसर येथील टिमा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Infection in contact with a three-year-old girl


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infection in contact with a three-year-old girl