esakal | मातांनो, आता बाळाची काळजी घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

लॉकडाऊनमुळे बेबी फूडचा तुटवडा

मातांनो, आता बाळाची काळजी घ्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वाढलेल्या लॉकडाऊनचा फटका बेबी फूडला बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाहेरगावी गेलेले कर्मचारी तेथेच अडकले आहेत; तर काही कर्मचारी कोरोनाच्या भीतीने कामावर येत नसल्याने बेबी फूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात बेबी फूडचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

Lockdown 2.0 सुरु राहणारच, पण 20 एप्रिलनंतर सुरु होणाऱ्या गोष्टींवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

बेबी फुडमध्येड्रायफ्रुट्‌स पावडर, प्रोटीन पावडर, मिल्क पावडर, सेरेलॅक्‍स अशा पदार्थांची विक्री कंपन्यांकडून केली जाते. अशा 4 ते 5 मोठ्या कंपन्या सध्या आहेत; मात्र लॉकडाऊनमुळे कंपन्यांमधील काही कर्मचारी गावी गेले आहेत. तर काही लांब राहत असल्याने येत नाहीत आणि काही भीतीनेही कामावर येत नाहीत. त्यामुळे बाजारात गरज असतानाही उत्पादन घटून तुटवडा निर्माण झाल्याचे ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डरचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

 २० एप्रिलपासून सुटणाऱ्या अतिरिक्त बसेसची लिस्ट...  

दुकानांमध्ये बेबी फूड उपलब्ध नसून काही मोठ्या दुकानांमध्येच विक्रीसाठी आहे. पुढील काही दिवस बेबी फूडची उपलब्धता कमीच राहील असेही पांडे म्हणाले. बेबी फुडमध्ये 10 हुन अधिक प्रकार मिळतात; मात्र सध्या त्याचा तुटवडा आहे. कंपन्यांमधून मालाचा पुरवठा होत नाही.

झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना व्हायरस...

कंपनीमध्ये बेबी फूड आणण्यासाठी सकाळी 10 वाजता गेल्यावर 2 वाजेपर्यंत लाईन मध्ये उभे राहावे लागते. त्यामध्ये हवा तो आणि हवा तितका माल उपलब्धही होत नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात एफडीएला निवेदन केल्याचे अंधेरीतील स्टेट इंडिया फार्माचे हकीम कपासी यांनी सांगितले. 

आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

लहान बाळाला महिन्याला 3 ते 4 पॅकेट वेगवेगळ्या प्रकारचे बेबी फूड लागते. मार्केटमध्ये बेबी फूड आणायला गेले असता अनेक ठिकाणी बेबी फूड नव्हते. एका दुकानात होते; मात्र तिथे भली मोठी रांग लागली होती. रांगेत उभे राहून बेबी फूड घेण्याशिवाय पर्याय नव्हता, शेवटी तब्बल दीड तास रांगेत उभे राहून बेबी फूड घेतले. 
- दिप्ती आंनद,
गृहिणी, अंधेरी

Baby food shortages in Lockdown