राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण; सौम्य लक्षणे असल्याने होम क्वारंटाईन

तुषार सोनवणे
Monday, 28 September 2020

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस मोठे विक्रम नोंदवत असताना आज, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे प्रशासनातील त्यांच्या संपर्कात असलेल्यांची चिंता वाढली आहे.

मुंबईतील पूरग्रस्तांना दहा हजारांचे मदत करा, भाजपची मोर्चाद्वारे मागणी

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी चाचणी केली होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कुमार यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित होते. यापार्श्वभूमीर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

महापौरांची ताबडतोब हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांचे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

राज्यात कोरोनाचे थैमान वाढत दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाचे १८,०५६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३८० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६६% एवढा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection to state chief secretary Sanjay Kumar