चिंताजनक ! नवी मुंबईत कोरोनामुळे मृतांच्या संख्येत भर, तर इतके जण बाधित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

एपीएमसी मार्केटमध्ये कामाला असणाऱ्या तीन जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये मसाला वर्गीकरण करण्याचे काम करणाऱ्या 53 वर्षीय महिलेचा 17 मे रोजी मृत्यू झाला. परंतु ती महिला कोरोनाबधित असल्याचा अहवाल आज मिळाला.

नवी मुंबई : शहरात कोरोनाबधित रुग्णांचा आकडा घसरला असला तरी मृत्यूचे तांडव अद्याप थांबलेले नाही. आज महापालिकेला प्राप्त झालेल्या अहवालात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. मृतांमध्ये पाच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 

हे ही वाचा : चेकमेट ! म्हणून फडणवीसांनी अनेकदा करवून घेतलेलं 'मिरची हवन'

आज अहवालात नोंद असलेल्या 6 मृतांमुळे आत्ता पर्यंत कोरोनामुळे मयत झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 45 पर्यंत गेली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये कामाला असणाऱ्या तीन जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये मसाला वर्गीकरण करण्याचे काम करणाऱ्या 53 वर्षीय महिलेचा 17 मे रोजी मृत्यू झाला. परंतु ती महिला कोरोनाबधित असल्याचा अहवाल आज मिळाला. तिला आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. धान्य मार्केटमध्ये दुकानांचे दरवाजे उघडणाऱ्या 65 वर्षाच्या कामगाराला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचा रुग्णालयात 19 मे ला मृत्यू झाला. परंतु आज ते कोरोनाबधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. धान्य बाजारातील 57 वर्षीय कामगाराचा मंगळवारी रात्री 12 वाजता मृत्यू झाला. त्यांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास होता. 

नक्की वाचा आणखीन एक मोठा खुलासा ! असे सापडले होते 'गायब झालेले' अजित पवार....

शहरात 43 नवे रुग्ण
नेरुळ सेक्टर 10 येथे राहणाऱ्या 75 वर्षीय महिलेचा नेरुळमधील डी. वाय पाटील रुग्णालयात मृत्यू झाला. वृद्धपकाळामुळे त्यांना विविध आजार झाले होते. तुर्भे सेक्टर 21 येथील एका 34 वर्षीय नाका कामगाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला आधीपासूनच दम्याचा त्रास होता. आज शहरात कोरोनाचे 43 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 787 एवढी झाली आहे.

Corona kills six in Navi Mumbai Death toll rises to 4, read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona kills six in Navi Mumbai Death toll rises to 4, read detail story