esakal | चेकमेट ! म्हणून फडणवीसांनी अनेकदा करवून घेतलेलं 'मिरची हवन'
sakal

बोलून बातमी शोधा

चेकमेट ! म्हणून फडणवीसांनी अनेकदा करवून घेतलेलं 'मिरची हवन'

देवेंद्र फडणवीस जेव्हा शपथ घेणार होते. त्याआधी त्यांनी मिरची हवन केलं होतं असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

चेकमेट ! म्हणून फडणवीसांनी अनेकदा करवून घेतलेलं 'मिरची हवन'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - विधानसभा निवडणूक 2019 च्यावेळी राज्यात राजकारणाची बदलती समीकरणं संपूर्ण राज्यानं पाहिली. नोव्हेंबर 2019 मध्ये राज्यात राजकीय भूकंप झाला होता. भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीत फूट पडली होती. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची गणितं जुळत होती. मात्र त्याच दरम्यान 23 नोव्हेंबरला पहाटे पहाटे मोठा राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे राजभवन गाठलं आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार झाले. वृत्तवाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार, पहाटे 4 वाजता फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजभवनावर उपस्थित होत्या. पण दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी फडणवीसांनी मिरची हवन केल्याचा खुलासा एका पुस्तकात करण्यात आला आहे. चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra) असं या पुस्तकाचं नाव आहे. सुधीर सूर्यवंशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक डिजिटल स्वरूपात प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकात फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल लिहिलं गेलं आहे. 

फडणवीसांनी केलेलं 'मिरची हवन' काय आहे?

देवेंद्र फडणवीस जेव्हा शपथ घेणार होते. त्याआधी त्यांनी मिरची हवन केलं होतं असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या नालखेडामधील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हे हवन करुन घेतल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. उत्तरखंडमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळी हरीश रावत सरकारही कोसळण्याच्या स्थितीत होतं. त्यावेळी हरीश रावत यांनी हे मिरची हवन केलं आणि त्यांचं सरकार हे हवन केल्यामुळे वाचलं असं फडणवीसांना कोणीतरी सांगितलं होतं. जेव्हा रावत सरकार राज्यातलं बहुमत गमावण्याच्या स्थितीत होतं. तेव्हा रावत यांचा भाऊ जगदीश रावत हे मिरची हवन करण्यासाठी थेट बागलामुखी मंदिरात पोहोचले होते. त्यावेळी या मिरची हवन केल्यानं हरीश रावत यांचं सरकार स्थिरावलं असं बोललं जातं. तेव्हापासून हे मंदिर राजकारणी आणि व्यावसायिकांमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

#चेकमेट ! पहाटे पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेताना धनंजय मुंडे 'इथे' होते

त्याच दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात सत्तास्थापनेची गणितं बदलली होती. भाजपमध्ये अस्वस्था निर्माण झाली. त्यावेळी भाजपचं सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांनी सुद्धा मिरची हवन केलं होतं, असं पुस्तकात म्हटलं आहे. 

वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, जर हे मिरची हवन मुंबईतल्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर केलं गेलं तर आपण पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री अशी खात्री फडणवीसांना होती. दरम्यान यापूर्वी देखील अनेक वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळून ठेवण्यासाठी अशा प्रकारचं मिरची हवन केलं आहे. एकदा हवन झाल्यानंतर तांत्रिकांला दक्षिणा दिली गेली आणि ते मध्य प्रदेशात निघून गेले. त्यांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था प्रसाद लाड यांनी केली होती, असंही या पुस्तकात म्हटलं आहे.

एवढंच काय तर मिरची हवन करणारा जो तांत्रिक आहे त्यानं फडणवीसांना शपथविधीच्यावेळी काळ्या रंगाचं जॅकेट घालण्यास सांगितलं होतं. त्यानुसार फडणवीसांनी आपलं आवडत्या निळा रंगाचं जॅकेट नाकारात काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं, हे देखील पुस्तकात नमूद केलं गेलं आहे.

why and how devendra fadanavis did mirchi havan writer sudhir suryawnashi writes in his book checkmate