esakal | कोविडमुळे कर्करुग्णांचा मृत्यूशी संघर्ष; सातपैकी एक शस्त्रक्रिया टाळावी लागली |Corona
sakal

बोलून बातमी शोधा

Cancer patients treatment

कोविडमुळे कर्करुग्णांचा मृत्यूशी संघर्ष; सातपैकी एक शस्त्रक्रिया टाळावी लागली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना काळात (corona pandemic) कर्करुग्णांच्या सात शस्त्रक्रियांपैकी (cancer surgery) एक गंभीर शस्त्रक्रिया टाळावी लागली. त्यामुळे रुग्णांना गेले दीड वर्ष मृत्यूशी संघर्ष करावा लागल्याची (patient serious) गंभीर बाब लॅन्सेटच्या अहवालातून (Lancet report) समोर आली आहे.

हेही वाचा: सहा वर्षांच्या मुलीवर कांदिवलीत अत्याचार; डिलिव्हरी बॉयला अटक

जगभरातील २० हजार रुग्ण आणि १,५६६ भारतीय रुग्णांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. हे रुग्ण १५ प्रकारांच्या कर्करोगाने ग्रस्त होते. जगभरातील ६१ देशांतील ४६६ रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र कोरोनामुळे त्यांना शस्त्रक्रियेसाठी ऑगस्ट २०२० पर्यंत वाट पाहावी लागली. २० हजारपैकी १० टक्के म्हणजेच २००३ जणांना शस्त्रक्रियेसाठी २३ आठवड्यांचा विलंब सहन करावा लागला किंवा कोविड संसर्ग झाल्याने शस्त्रक्रियाच टाळावी लागली, असे या अहवालात म्हटले आहे.

त्यामुळे या २००३ रुग्णांपैकी ४५३ रुग्णांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले; तर १७९ रुग्णांमध्ये इतर आजाराचीही निर्मिती झाली, निश्चित शस्त्रक्रियेपूर्वी ४८ जणांचा मृत्यू झाला, अशीही गंभीर बाब अहवालातून समोर आली आहे. यातील १४ रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे झालेल्या अडचणींमुळे आणि ३४ जणांचा मृत्यू नॉनकोविड अडचणींमुळे झाला आहे. लॉकडाऊनमध्ये कर्करुग्णांना सुविधा देणे कठीण झाले असल्याचे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. शैलेंद्र श्रीखंडे यांनी सांगितले. शिवाय कर्करुग्णांमध्ये माहितीच्या अभावाने कोरोना संसर्ग होण्याची भीती वाढल्याचेही ते म्हणाले.

रुग्ण नोंदणीतही घट

कोरोनापूर्वी टाटा मेमोरियल रुग्णालयात वर्षाला ८० हजार कर्करुग्णांची नोंदणी होत होती. कोरोनानंतर २०२० मध्ये ६२ हजार रुग्ण नोंदवण्यात आले; मात्र आता निव्वळ कोविडमुळे कर्करुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवणार नाहीत, अशी ग्वाही टाटा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top