...तरीही कोविड काळात प्रदूषण धोकादायक पातळीवरच

Pollution
PollutionSakal

मुंबई : कोविड काळात (corona pandemic) तीन ते चार महिने मुंबईतील सर्व व्यवहार (Mumbai trading) बंदच होते. फक्त आपात्कालीन सेवा सुरु होत्या. अशा परीस्थीतीतही गेल्या वर्षी प्रदुषणाची पातळी (pollution level) मानांकाने पेक्षा जास्त होतीच. वांद्रे कुर्ला संकुल (BKC), मालाड, अंधेरी (andheri) या भागात प्रदुषणाची पातळी मानांकना पेक्षा जास्त जास्त नोंदविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे काही भागातील कोविड वर्षातील प्रदुषणाची पातळी त्या पुर्वीच्या वर्षा पेक्षा अधिक आहे. सुरवातीच्या चार महिन्यात घटलेली प्रदुषणाची पातळी लोकल मधील प्रवासाच्या निर्बंधामुळे (train travelling restrictions) रस्त्यांवर वाहाने वाढल्याने वाढली असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Pollution
अग्निशमन अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचे निधन

वांद्रे कुर्ला संकुलातील प्रदुषणाची पातळी मानांकना पेक्षा दुप्पट आहे. तर, मालाड आणि अंधेरीतील प्रदुषणाची पातळी मानकांना पेक्षा दुपट्टी पर्यंत नोंदविण्यात आली आहे. महापालिकेने 2021-22 वर्षाचा पर्यावरण स्थीती दर्शक अहवाल महासभेला सादर केला आहे.या अहवालात गेल्या तीन आर्थिक वर्षातील प्रदुषणाची सरासरी पातळी नमुद करण्यात आली आहे.कोविडच्या सुरवातीच्या तीन ते चार महिन्यात मुंबईतील सर्व व्यवहार बंद होते.त्यामुळे प्रदुषणाचे प्रमाण घटले होते.असे असले तरी वर्षाच्या सरीसराची विचार केल्यास प्रदुषणाची मानांकना पेक्षा जास्तच होती.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार तरंगते धुलिकण (पी.एम 10)चे प्रत्येक घनमिटर हवेत जास्तीत जास्त प्रमाण 60 मायक्रोग्रॅम हवे.तर,पी.एम 2.5 चे प्रमाण 40 मायक्रोग्रॅम हवे.पण,मुंबईतील सरासरी प्रदुषणाची पातळी यापेक्षा जास्त होती.वर्षभरातील संपुर्ण मुंबईत पी.एम 2.5 चे प्रमाण 46 मायक्रोगॅम होते.तर,पी.एम 10चे प्रमाण 91 मायक्रो ग्रॅम होते.

वरळी स्वच्छ

मुंबईतील नऊ ठिकाणी केंद्र सरकारच्या सफर उपक्रमा अंतर्गत प्रदुषण मापके बसविण्यात आली आहेत.त्यातील फक्त वरळीतील हवाच मानांकनाच्या तुलनेत स्वच्छ असल्याचे आढळले आहे.वरळीत वर्षभरात पी.एम 2.5 चे प्रमाण 35 मायक्रोग्रॅम आणि पी.एम 10 चे प्रमाण 58 मायक्रोग्रॅम नोंदविण्यात आले आहे.

लोकल निर्बंधांचा फटका

कोविडच्या सुरवातीच्या काळात रस्त्यांवर वाहाने तुरळक होती.बांधकामेही बंद होतीच त्याच बरोबर उद्योगांवरही परीणाम झाला होता.त्यामुळे या काळात प्रदुषणाची पातळी घटली होती.मात्र,नंतर निर्बंध शिथील झाल्यानंतर लोकल प्रवासाला निर्बंध होते.त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक प्रचंड वाढली होती. पुर्ण लॉकडाऊन असताना घसरलेली प्रदुषणाची पातळी लॉकडाऊन शिथील झाल्यावर वाहानांची संख्या वाढली.त्यामुळे प्रदुषणातही वाढ झाली असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Pollution
2 लाख किंमतीचा 21 किलो गांजा जप्त : रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला यश

बीकेसी सर्वाधिक प्रदुषीत

वांद्रे कुर्ला संकुल परीसरात सर्वाधिक प्रदुषण गेल्या वर्षात नोंदविण्यात आले आहे.या ठिकाणी वर्षभरात पी.एम.10ची सरासरी पातळी 122 मायक्रोग्रॅम होती.तर,पी.एम 2.5 ची पातळी 57 मायक्रोग्रॅम होती.त्या खालोखाल मालाड मध्ये पी.एम 10 चे प्रमाण 115 एकक आणि पी.एम 2.5 चे प्रमाण 57 मायक्रोग्रॅम होते.तीसऱ्या क्रमांवर प्रदुषीत भाग अंधेरी आहे.येथे पी.एम 10 चे प्रमाण 110 मायक्रोग्रॅम आणि पी.एम2.5चे प्रमाण 51 मायक्रोग्रॅम नोंदविण्यात आले आहे.

- पी.एम म्हणजे अतीसुक्ष्म धुलिकण असतात.हे श्‍वसना बरोबर फुफ्फुसा पर्यंत जातात.त्यातून श्‍वसनाचे विकार होतात.यात अस्थमा,ब्रॉनकाईनटिस अशा आजारांसह अतिगंभिर आजारांचाही धोका असतो.

-डोळ्यांना तसेच घशालाही त्रास होऊ शकतो.

-2019-20 या वर्षापेक्षा 2020-21 या लॉकडाऊनच्या वर्षातही काही भागातील प्रदुषणाची पातळी वाढली आहे.

-2019-20 मध्ये भांडूप येथे पी.एम10 चे प्रमाण 59 मायक्रोग्रॅम होते ते गेल्या वर्षी 63 मायक्रोग्रॅम पर्यंत पोहचले होते.

-भांडूप मध्येच गेल्या वर्षी पी.एम2.5 चे प्रमाण 32 मायक्रोग्रॅम होते तर त्यापुर्वीच्या वर्षात 31 मायक्रोग्रॅम होते.

-2019-20 मध्ये बीकेसी येथे पी.एम10 चे प्रमाण 144 मायक्रोग्रॅम होते ते गेल्या वर्षी 122 मायक्रोग्रॅम पर्यंत पोहचले होते.

-2019-20 मध्ये कुलाबा येथे पी.एम10 चे प्रमाण 66 मायक्रोग्रॅम होते ते गेल्या वर्षी 90 मायक्रोग्रॅम पर्यंत पोहचले होते.

र्-कुलाबा येथे गेल्या वर्षी पी.एम2.5 चे प्रमाण 41 मायक्रोग्रॅम होते तर त्यापुर्वीच्या वर्षात 34 मायक्रोग्रॅम होते.

-मालाड मध्ये 2019-20 या वर्षात पी.एम 10चे प्रमाण 95 मायक्रोग्रॅम होते तर गेल्या वर्षी हे प्रमाण 115 मायक्रोग्रॅम पर्यंत वाढले होते.

-बोरीवलीतील पी.एम 10चे प्रमाण 2019-20 या वर्षात 86मायक्रोग्रॅम नोंदविण्यात आले होते तर गेल्या वर्षी 97 मायक्रोग्रॅम नोंदविण्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com