मुंबईकरांना दिलासा! कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी 120 दिवसांवर; रुग्ण बरे होण्याचा दर वधारला

मिलिंद तांबे
Saturday, 24 October 2020

मुंबईत आज 1,257 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,50,061 झाली आहे. मुंबईत आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,016 वर पोचला आहे.

मुंबई : मुंबईत आज 1,257 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,50,061 झाली आहे. मुंबईत आज 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,016 वर पोचला आहे. मुंबईत आज 898 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,19,152 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त ट्‌विट करणाऱ्याची याचिका न्यायालयाकडून नामंजूर!

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 120 दिवसांवर गेला आहे. तर 23 ऑक्टोबर पर्यंत एकूण 14,37,445  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.58 इतका आहे.
बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 9,935 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 878 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
मुंबईत 633 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 8,585 इतकी आहे. 

अर्णब गोस्वामी पुन्हा गैरहजर! "कारणे दाखवा'साठी पोलिसांत येणे टाळले

मुंबईत आज नोंद झालेल्या 450 मृत्यूंपैकी 37 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 35 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 50 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते. 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 41 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.      

Corona patient double duration at 120 days in mumbai

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient double duration at 120 days in mumbai