मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी नव्वदीवर;  रूग्णवाढीचा सरासरी दर 0.78% वर

मिलिंद तांबे
Thursday, 20 August 2020

मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी वाढून नव्वदीवर पोहोचला असून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. रूग्णवाढीचा सरासरी दरही आणखी कमी होत आज 0.78% पर्यंत खाली आला आहे.

मुंबई - मुंबईत रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी वाढून नव्वदीवर पोहोचला असून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. रूग्णवाढीचा सरासरी दरही आणखी कमी होत आज 0.78% पर्यंत खाली आला आहे. तर मुंबईतील 24 पैकी तब्बल 9 विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांच्या वर आहे. 

कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर; शिल्पा शेट्टीची बाप्पाचरणी प्रार्थना

मुंबईतील रूग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 0.78% असा कमी झाला आहे. तर 24 पैकी 19 विभागात  हा सरासरी दर 1% पेक्षा कमी आहे. याशिवाय मुंबईतील 24 पैकी तब्बल 9 विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांच्या वर आला असून 5 विभागात 90 दिवसांवर, 4 विभागात 80 दिवसांवर, 1 विभागात 70 दिवसांवर , 4 विभागात 60 दिवसांवर आला आहे. 

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेचा गंभीर आरोप; मुलाच्या कंपनीला जम्बो कोव्हिडचे कंत्राट दिल्याचे प्रकरण

आज 1275 नवे रूग्ण तर 46 रूग्णांचा मृत्यू 
मुंबईत आज आज 1,275 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,32,817 झाली आहे.मुंबईत आज 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,311 वर पोचला आहे. मुंबईत आज 976 रुग्ण बरे होऊन घरी गेले.                                                

मुंबईत आज नोंद झालेल्या 46 मृत्यूंपैकी 35 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 35 पुरुष तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 46 रुग्णांपैकी 28 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 18 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   

मोठी बातमी! सीबीआयच्या पथकाला क्वारंटाईनमधून सूट मिळण्याची शक्यता? वाचा सविस्तर

कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 976 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,07,033 रुग्णांना घरी सोडण्यात आले.  

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient doubling period in Mumbai to ninety; The average growth rate is 0.78%