शेवटी धीर खचला आणि कोरोना रुग्णाने उचललं नको ते पाऊल, मनाला चटका लावून जाणारी बातमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याचे प्रकार मुंबईत आणि महाराष्ट्रात या आधीच घडले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या एका रुग्णाने सेव्हन हिल रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई - मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याचे प्रकार मुंबईत आणि महाराष्ट्रात या आधीच घडले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या एका रुग्णाने सेव्हन हिल रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णाची ही दुसरी आत्महत्या आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाचे 12 हजार रुग्ण आहेत. रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. कामा रुग्णालयातून कोरोनाचा एक रुग्ण पळून गेल्याने त्याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायन रुग्णालयातून खिडकीतून पळून जाणाऱ्या रुग्णाला पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून पुन्हा वॉर्डमध्ये भरती केले आहे.

सर्वात मोठी खुशखबर ! गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून लालपरीची मोफत सेवा - अनिल परब 

60 वर्षीय वृध्दाची आत्महत्या- 

हे सर्व प्रकार ताजे असतानाच मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील सेव्हन हिल रुग्णालयात कोरोना झाल्याने भरती झालेल्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. हा रुग्ण 60 वर्षीय असून त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून वारंवार कोरोनाबद्दल जनजागृती केली जातेय. कोरोना कसा पसरतो. कोरोनावर आपण कशी मात करू शकतो ही सर्व माहिती उपलब्ध सर्व माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जातेय. अशातही एखाद्या कोरोना रुग्णाने आत्महत्या करणं मनाला चटका लावून  जाणारं आहे.  

नोकरी गेली तरी घाबरू नका ! सरकारची 'ही' योजना देते दोन वर्षांचा पगार...

corona patient take unwanted steps and finished himself read emotional story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient take unwanted steps and finished himself read emotional story