सर्वात मोठी खुशखबर ! गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून लालपरीची मोफत सेवा - अनिल परब 

सर्वात मोठी खुशखबर ! गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून लालपरीची मोफत सेवा - अनिल परब 

मुंबई - जगात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारनं तातडीनं संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामुळे देशभरात अनेक ठिकाणी कामानिमित्त, नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले लोकं तिथेच अडकलेत.  मात्र आता अशा नागरिकांसाठी राज्य सरकारनं एक मोठी गुड न्यूज दिली आहे.

राज्य सरकारकडून महाराष्ट्रात अडकलेल्यांना त्यांच्या राज्यात किंवा जिल्ह्यात परत पाठवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. आता राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरवली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. मात्र एसटीतर्फे ही सेवा येत्या १८ मेपर्यंतच पुरवली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलंय.

मुंबई-पुण्यातून कुणाला प्रवास करता येईल का ? 

"मुंबई-पुण्यासारख्या रेड झोनमधील कोणालाही प्रवास करता येणार नाही. प्रत्येकाला परवानगी घेऊनच प्रवास करायचा आहे. त्यापूर्वी त्यांची थर्मल स्क्रीनिंग, तपासणी करुन परवानगी दिली जाईल. लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यावर गर्दी करु नये. सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. लोकांनी व्यवस्थित माहिती घेऊन आणि शिस्त पाळून मूळगावी परत जावं. पॉईंट टू पॉईंट सेवा आहे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी अन्नपाणी सोबत ठेवावं. एसटीचीच प्रसाधन गृह वापरण्यात येतील. ती स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात येणार आहे", अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

प्रवासाची सर्व माहिती येणार मोबाईलवर:

ज्यांना ग्रुपमध्ये प्रवास करायचा आहे  त्यांनी त्यांची नावं ,पत्ता, इच्छित स्थळ, आधार कार्ड क्रमांक ही माहिती भरलेला अर्ज शहरी भागात पोलिस आयुक्तालयात जमा करायचा आहे. तर ग्रामीण भागातल्या लोकांनी  जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे अर्ज द्यायचा आहे. ज्या जिल्ह्यात जायचं आहे त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर प्रवासाची एसटी बस कुठून आणि किती वाजता निघणार याची माहिती मोबाईलद्वारे दिली जाणार आहे.

तसंच ज्यांना एकट्याने प्रवास करायचा आहे अशा लोकांसाठी एसटीने पोर्टल तयार केलं आहे आणि ते सोमवारपासून सुरु होणार आहे. त्यावर ऑनलाईन परवानगी घेतल्यानंतर त्यांना प्रवासाची माहिती दिली जाईल," असंही अनिल परब म्हणालेत. 

सर्व अटींचं पालन करणं बंधनकारक:

आपल्या मूळगावी परत जाण्यासाठी लोकांना सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे. "प्रत्येक सीटवर एक प्रवासी असणार आहे. मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. एसटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हाताला सॅनिटायझर लावणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक बस प्रवास सुरु होण्याआधी आणि प्रवासानंतर निर्जंतुक केली जाणार आहे. जिल्ह्यात एसटी पोहोचेल तिथले नोडल अधिकारी प्रवाशांची काळजी घेतील. गरज भासली तर प्रवाशांची  वैद्यकीय तपासणी केली जाईल.

free st bus service will run from monday says anil parab know how you can travel

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com