मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार पार; आज 'इतके' नवे रुग्ण.. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

मुंबईत आज 1300 नवीन रुग्णांची भर पडली असून त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 75,047 झाली आहे. तर 87 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4369 वर पोचला आहे. 

मुंबई : मुंबईत आज 1300 नवीन रुग्णांची भर पडली असून त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 75,047 झाली आहे. तर 87 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा 4369 वर पोचला आहे. 

 हेही वाचा: संतप्त मूर्तिकार आंदोलनाच्या पवित्र्यात, मंडप परवानगीसाठी सरकारकडून अजूनही निर्देश नाही..

मृतांपैकी 23 रुग्णांचा मृत्यू 48 तासात झाला असून 64 मृत्यू अगोदरच आहेत. मात्र मुंबईत आज एका दिवसात 823 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 
                                                      
मुंबईत आज नोंद झालेल्या 87 मृत्यूंपैकी 54 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 55 पुरुष तर 32 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 6 जणांचे वय 40 च्या खाली होतेे. तर 49 रुग्ण 60 वर्षावरील होते तर 32 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.     

हेही वाचा: सावध व्हा, मुंबईत कोरोनानंतर मुलांना 'या' आजाराची लागण... 

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 728 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 51,972 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 823 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  43,154 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

corona patients crosses 75 thousand mark                                


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients crosses 75 thousand mark