esakal | सावध व्हा, मुंबईत कोरोनानंतर मुलांना 'या' आजाराची लागण... 
sakal

बोलून बातमी शोधा

सावध व्हा, मुंबईत कोरोनानंतर मुलांना 'या' आजाराची लागण... 
  • कोरोनानंतर एका अज्ञात आजारानंही या चिमुरड्यांना विळखा घातला आहे.
  • देशातला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिल्यावर मुंबईत ही सर्वाधिक रुग्ण आढळलेत.

सावध व्हा, मुंबईत कोरोनानंतर मुलांना 'या' आजाराची लागण... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसचा लढा देत आहेत. या दरम्यान आता अनेक देशात विविध आजार उद्भवत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची वेगळी लक्षणं दिसू लागलीत. त्यातच आता कोरोनानंतर एका अज्ञात आजारानंही या चिमुरड्यांना विळखा घातला आहे. देशातला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाहिल्यावर मुंबईत ही सर्वाधिक रुग्ण आढळलेत. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असताना दुसरीकडे मुंबईत आणखी एक संकट उभं टाकलं आहे. मुंबईतल्या मुलांमध्ये कावासाकी आजाराची लक्षणं आढळून आलीत. 

काय सांगता? ऑनलाईन वर्गच झाला हॅक; सायबर गुन्हेगारांचा ऑनलाईन शिक्षणावरही डोळा...

पश्चिम मुंबईतील एका रुग्णात या आजारीची लक्षण आढळून आली आहे. भारतात कावासाकी आजारी लक्षण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे. या आठवड्यात मुंबईतील खासगी रुग्णालयात एका 14 वर्षांच्या मुलीमध्ये पुरळ आणि तीव्र ताप, दोन सामान्य कावासाकीची लक्षणं आढळून आलीत. शरिरावर आलेले हे डाग कावासाकी आजाराची लक्षण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्या मुलीला कोविड-19ची चाचणीही पॉझिटिव्ह आणि रुग्णाची प्रकृती अचानक खालावल्यानं शुक्रवारी तिला रात्री आयसीयूमध्ये हलविण्यात आले. या मुलीवर वेगवेगळी औषधांसह टोसिलजेमेब दिले जात आहे. डॉक्टर, ज्यांनी तिला स्टिरॉइड्स, इम्युनोसप्रप्रेसन्ट ड्रग टॉसिलिझुमब आणि इम्युनोग्लोब्युलिनची उच्च मात्रा दिली आहे. या मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिलाही कोरोनाची लागण झाली. या 14 वर्षाच्या रुग्णाचे वडील कोकिलाबेन रुग्णालयात कर्मचारी आहेत.

अमेरिका, ब्रिटेन, स्पेन, इटली आणि चीनमध्ये एप्रिल महिन्यापासून कोविड-19 च्या मुलांमध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. भारतातच नाहीतर इतर देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजाराची लक्षणे आढळून आली. 
अमेरिकेत आतापर्यंत 58 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कावासाकी आजारीची लक्षण आढळून आली. तर मे महिन्यात अमेरिकेतल्या 17 राज्यांमध्ये 164 मुलांना याची लागण झाली तर 3 मुलांचा मृत्यू झाला. कावासाकी आजाराची लक्षण ही शक्य तो 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळून येतात. 

सावधान ! कोरोनासह देशात मधुमेह बळावतोय; एकट्या महाराष्ट्रातील मधुमेही रुग्णांची संख्या वाचून धडकी भरेल

बालरोग तज्ञ तनु सिंघल यांनी सांगितले की, कावासाकी आजाराचा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर परिणाम होतो. कोविडसह 10-14 वर्षातील मुलांमध्ये लक्षणे दर्शवितात. पुढे सिंघल म्हणाल्या, कावासाकी आजारीची लक्षण आढळून आलेल्या युवकांची प्रकृती लवकर खालावत जाते. अशावेळी त्या मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले पाहिजे. 

कावासाकी आजाराची लक्षणं? 

ज्या मुलांना हा आजार झाला आहे, ते सर्वजण 2 ते 15 वयोगटातील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्वचा आणि नसांना सूज ही सुरुवातीची लक्षणं आहेत. मुलांच्या डोळ्यांमध्ये जळजळ जाणवते, शरीरावर लाल चट्टे येतात. शिवाय त्वचेचा रंगही बदलो. भरपूर दिवस ताप, पोट आणि छातीत गंभीर वेदना, ब्लड प्रेशर कमी होतं या समस्या मुलांमध्ये दिसून येतात.

loading image