esakal | रुग्णालयातून पळालेल्या 'त्या' वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; ट्रेनच्या धडकेत गमावला जीव...
sakal

बोलून बातमी शोधा

shoes on track

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटना सतत घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय वृद्ध रुग्ण पळून गेल्याची घटना घडली होती.

रुग्णालयातून पळालेल्या 'त्या' वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; ट्रेनच्या धडकेत गमावला जीव...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटना सतत घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून ८० वर्षीय वृद्ध रुग्ण पळून गेल्याची घटना घडली होती. त्यांनतर त्यांचा मृतदेह बोरीवली रेल्वे स्थानकात आढळला होता. मात्र आता त्यांच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं आहे. 

रुग्णालयातून पळालेल्या या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू ट्रेनच्या धडकेत झाला अशी माहिती समोर आली आहे. मालाड पूर्वेला कुरार व्हिलेजमध्ये हा व्यक्ती राहत होता. घरी परतत असताना हा अपघात घडला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा: मुंबईत लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' मुलाला मिळाला जमीन, कोर्टानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण...

काही दिवसांपूर्वी या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यांनतर त्यांना तातडीनं रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. मात्र ते अचानक रुग्णालयातून पळून गेले अशी माहिती रुग्णालयानं त्यांच्या कुटुंबाला दिली होती. त्यांनतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु झाला होता. मात्र पोलिसांना त्यांचा मृतदेह बोरीवली रेल्वे स्थानकावर आढळला होता. 

सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास  ही व्यक्ती कांदिवली स्थानकाजवळ पोहोचली. मात्र रेल्वे रुळ ओलांडत असताना श्रमिक एक्स्प्रेस ट्रेननं धडक दिली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांना त्यांचा मृतदेह रुळावर आढळला होता. त्यांनतर त्यांना पुन्हा शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

हेही वाचा: ट्विटरचं नवं फीचर; स्टोरी स्वरुपात शेअर करता येणार तुमचं 'फ्लीट्स'...

चौकशी दरम्यान ही वृद्ध व्यक्ती म्हणजे रुग्णालयातून बेपत्ता झालेला कोरोना रुग्ण असल्याचं समोर आलं. त्यात या व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

corona patients who missing from hospital found in borivali 

loading image
go to top